‘राष्ट्रीय सेवा योजने’त विद्यापीठ राज्यात उत्कृष्ट
By admin | Published: June 16, 2015 12:55 AM2015-06-16T00:55:09+5:302015-06-16T01:17:20+5:30
गायकवाड यांना ‘उत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक’ पुरस्कार
कोल्हापूर : राष्ट्रीय सेवा योजनेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनाने शिवाजी विद्यापीठाला ‘उत्कृष्ट विद्यापीठ’ आणि विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा. डॉ. डी. के. गायकवाड यांना ‘उत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक’ पुरस्काराने सन्मानित केले.राज्य शासनाने सन २०१२-१३ मधील या पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि. ८) मुंबईत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाच्यावतीने हे पुरस्कार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा. सुरेश जाधव, सुरेश मोरे, सुजित मुंढे यांनी स्वीकारला. दरम्यान, पुरस्काराबाबत बोलताना प्रा. डॉ. डी. के. गायकवाड म्हणाले, हा पुरस्कार राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल आहे. त्याचे श्रेय विद्यापीठ प्रशासन, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, स्वयंसेविका तसेच इतर घटक व सहकाऱ्यांना आहे. (प्रतिनिधी)