राष्ट्रीय क्रीडा समालोचक सुनील घोडके यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:12+5:302021-06-04T04:19:12+5:30

या वेळी मनोज फराकटे म्हणाले, बोरवडेसारख्या खेड्यात राहून ऑल इंडिया रेडिओ समालोचक बनणे आणि राष्ट्रीय स्तरावर बोरवडेचे नाव उंचावणे ...

National Sports Critic Sunil Ghodke felicitated on behalf of the villagers | राष्ट्रीय क्रीडा समालोचक सुनील घोडके यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार

राष्ट्रीय क्रीडा समालोचक सुनील घोडके यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार

Next

या वेळी मनोज फराकटे म्हणाले, बोरवडेसारख्या खेड्यात राहून ऑल इंडिया रेडिओ समालोचक बनणे आणि राष्ट्रीय स्तरावर बोरवडेचे नाव उंचावणे हे त्यांचे काम अभिमानास्पद बाब आहे. ग्रामीण भागातील युवकांना त्यांनी मार्गदर्शन करावे. याप्रसंगी सुनील घोडके यांनी प्राथमिक शाळेला क्रीडा साहित्य खरेदीसाठी अकरा हजार रुपयांची देणगी दिली. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य रघुनाथ कुंभार, माजी उपसरपंच ज्ञानदेव फराकटे, भागवत वारके, विलास भारमल, शिवाजी फराकटे, पंडित साठे, युवराज साठे, विलास पोवार, पांडुरंग चव्हाण, अमृता चव्हाण, एम. टी. चांदेकर, दत्तात्रय चव्हाण उपस्थित होते.

चौकट करणे - सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सन्मान हा आपल्या आयुष्यातील सोनेरी क्षण असून, आपल्या तीस वर्षांच्या राष्ट्रीय समालोचनाच्या कारकिर्दीत अनेक क्रिकेटपटूंचे खेळणे जवळून पाहिले आहेत. यानिमित्ताने अनेक मानसन्मान मिळाले; पण गावच्या सत्काराने आपण भारावून गेलो. - सुनील घोडके

फोटो ओळी : बोरवडे (ता. कागल) येथे ग्रामस्थांच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा समालोचक सुनील घोडके यांचा वीजवितरण कंपनीतून सेवानिवृत्त झालेबद्दल सत्कार करताना सरपंच गणपतराव फराकटे, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे शेजारी रघुनाथ कुंभार, ज्ञानदेव फराकटे व इतर. (छाया- एम. टी. चांदेकर, बोरवडे)

Web Title: National Sports Critic Sunil Ghodke felicitated on behalf of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.