जिल्ह्यातील दोन आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन
By admin | Published: May 17, 2016 01:13 AM2016-05-17T01:13:15+5:302016-05-17T01:13:33+5:30
राज्यातील पहिला जिल्हा : ‘इस्पुर्ली’, ‘सरवडे’चा समावेश; दर्जेदार आरोग्यसेवेवर शिक्कामोर्तब
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -जिल्ह्यातील इस्पुर्ली (ता. करवीर), सरवडे (ता. राधानगरी) प्राथमिक आरोग्य केंद्रांना (पीएचसी) राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. आतापर्यंत राष्ट्रीय मानांकन मिळविलेली राज्यातील ही पहिली दोन आरोग्य केंद्रे ठरली आहेत. सन २००६ पासून देशात दहा आरोग्य केंद्रांना मानांकन मिळाले आहे. यंदा महाराष्ट्रातील या दोन आरोग्य केंद्रांचा मानांकनाच्या यादीत समावेश झाला आहे. जिल्ह्यात एकूण ७३ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रातून रुग्णांना चांगली आरोग्य सेवा आणि सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषद नेहमी प्रयत्नशील असते. लोकसहभागातून ६८ केंद्रांचा (पान १० वर)
गुजरातनंतर कोल्हापूर
सन २००६ ते २०१५ अखेर गुजरातमधील दाभोडा (जि. गांधीनगर), खिरासरा (राजकोट), हरियोल (साबरकंठा), टंकाल, कंडोलपाडा (नौसारी), खेरवा (मेहसाना), ओरना (सूरत), तर हरियाणामधील भाडसोन (कर्नाळ), भागल (कैथाल) या प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील करूणा ट्रस्टच्या रुग्णालयास राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. सन २०१६-१७ वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील इस्पुर्ली, सरवडे या प्राथमिक आरोग्य केंद्रांना मानांकन मिळाले आहे. सन २००९ ते २०१० मध्ये गुजरातमधील एकाच जिल्ह्यातील दोन आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळाले. त्यानंतर एकाच जिल्ह्यात दोन केंद्रांचा राष्ट्रीय मानांकनाचा मान कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला आहे.