शालेय हॉकीसाठी राज्य संघ जाहीर - झारखंडमध्ये राष्ट्रीय स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:18 AM2018-11-16T00:18:11+5:302018-11-16T00:20:41+5:30
झारखंड (रांची) येथे २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सतरा वर्षांखालील राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या मुली व मुलांचा संघ गुरुवारी कोल्हापुरात जाहीर करण्यात आला.
कोल्हापूर : झारखंड (रांची) येथे २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सतरा वर्षांखालील राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या मुली व मुलांचा संघ गुरुवारी कोल्हापुरात जाहीर करण्यात आला. यात कोल्हापूरच्या पाच मुली व सहा मुलांचा या संघांत समावेश आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे) अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे व हॉकी कोल्हापूरच्या सहकार्याने मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेतून मुला-मुलींचे संघ निवडण्यात आले. यात कोल्हापूर, मुंबई, लातूर, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पुणे या विभागाच्या संघांनी सहभाग घेतला होता. यातून मुली व मुलांच्या प्रत्येकी २४ जणांच्या संघाची निवड करण्यात आली. निवड झालेल्या मुलींच्या संघात कोल्हापूरच्या पाच, तर मुलांमध्ये सहा खेळाडूंचा समावेश आहे.
निवड झालेला सतरा वर्षांखालील मुलींचा राज्य संघ पुढीलप्रमाणे आंचल क्षीरसागर, प्रज्ञा भोसले, मनश्री शेडगे, ऋतुजा पिसाळ (क्रीडा प्रबोधिनी), अमृता जाधव, मोनिका आरबोळे, विद्या नगरे, अस्था महाजनी (कोल्हापूर), सायली वझाडे, प्रिया शुक्ल (अमरावती), साक्षी पगारे, गंगा पावरा (नाशिक), स्नेहा टिळेकर (सातारा), नंदिनी शिंदे (सोलापूर), हिमांगी गावडे (नागपूर), अस्मिता चव्हाण ( पुणे), ट्रिनेल वाझ (मुंबई), श्रीया पवार (औरंगाबाद), तर राखीव खेळाडूंमध्ये शक्ती पवार, स्वामिनी मेन्ये (पुणे), प्रेरणा बोडके (नागपूर), श्रृती पाटील (कोल्हापूर), काजल आटपाडकर (क्रीडा प्रबोधिनी), अंकिता ठवळे (लातूर) यांचा समावेश आहे.
मुलांचा संघ असा : आदित्य बिसले, मयूर धनवडे, सचिन कोळेकर, धैर्यशील जाधव (क्रीडा प्रबोधिनी), यश उरणकर, विश्वजित यमगेकर, कैस जमादार, खाजासाब शेख (कोल्हापूर), सौरभ मयेकर (मुंबई), अबुसुफीयान पटेल, अजय गायके (पुणे), विनय क्षीरसागर (अमरावती), पवन ठाकणे (औरंगाबाद), रामगडिया गुरुसेवक (लातूर), रौनक चौधरी (नागपूर), प्रतीक बिराजदार (सांगली), गौरखनाथ साखरे (सोलापूर), तर राखीव खेळाडूंमध्ये अवधूत गायकवाड, ज्ञानेश पवार (कोल्हापूर), समर खलतकर (मुंबई), गणेश चिट्टे (नाशिक), नयन ठोणे (अमरावती), संतोष भोसले (क्रीडा प्रबोधिनी) यांचा समावेश आहे.
या दोन्ही संघांची निवड झाल्याची घोषणा कोल्हापूरचे जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी गुरुवारी केली. निवड झालेल्या या दोन्ही संघांचे गुरुवार (दि. २२) पासून विशेष सराव शिबिर होणार आहे.