कोल्हापूर हळहळले! राष्ट्रीय महिला कुस्तीपटू गौरी उर्फ विनया पुजारीचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 09:19 PM2024-06-21T21:19:35+5:302024-06-21T21:20:01+5:30
अचानक निधनामुळे तेरवाडसह कुस्तीगीरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे
कुरुंदवाड - तेरवाड (ता. शिरोळ) राष्ट्रीय महिला कुस्तीपटू गौरी उर्फ विनया पुजारी (वय २४) हिचे शुक्रवारी सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. तिच्या अचानक निधनामुळे तेरवाडसह कुस्तीगीरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
गौरीला कुस्तीची आवड निर्माण झाल्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तीने राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवली होती. तीने आॅल इंडिया चॅम्पियनशिप, म्हैसूर केसरी, महाराष्ट्र चॅम्पियनशिप पदक मिळविले होते. अभिनेता अमिर खान यांच्या 'दंगल' चित्रपटात कुस्तीपटू म्हणून गौरीचा सहभाग होता.
पंजाबमधील पटियालामध्ये नॅशनल इन्स्टिट्युट स्पोर्टसमध्ये महिला कुस्ती प्रशिक्षक म्हणून तीची निवड झाली होती. सेवेत असतानाच आठ दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्याने कुटुंबाने तीला सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असतानाच शुक्रवारी निधन झाले. तीच्या निधनामुळे पुजारी कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तीच्या अंत्ययात्रेत राजकीय, सामाजिक व क्रिडा क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.