राष्ट्रवादी काँग्रेस आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:25 AM2021-08-26T04:25:48+5:302021-08-26T04:25:48+5:30

बांबवडे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवून लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ...

Nationalist Congress Review Meeting | राष्ट्रवादी काँग्रेस आढावा बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस आढावा बैठक

Next

बांबवडे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवून लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. सोनवणे बांबवडे तालुका शाहूवाडी येथील उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना स्थळावर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी सेलच्या विविध पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे देण्यात आली.

यावेळी मानसिंगराव गायकवाड म्हणाले की, पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूवाडी - पन्हाळा तालुक्यात राष्ट्रवादी भक्कम होत चाललेली आहे. याचा फायदा येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला निश्चितपणे होणार आहे.

यावेळी युवा नेते रणवीर सिंग गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळुंखे, ज्येष्ठ संचालक महादेवराव पाटील, जि. प. सदस्य विजय बोरगे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम मोरे, कार्यकारी संचालक भगवान पाटील, पंडितराव शेळके, प्रकाश पाटील, अजित पाटील, रणवीर युवाशक्तीचे अध्यक्ष समीर पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Nationalist Congress Review Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.