‘राष्ट्रवादी’ संतांची टोळी नव्हे!
By admin | Published: June 27, 2014 12:17 AM2014-06-27T00:17:07+5:302014-06-27T09:27:16+5:30
आरक्षणाचा निवडणुकीत फायदा होईलही, ताकाला जाताना भांडं लपवायची आमची पद्धत नाही. शेवटी राष्ट्रवादी म्हणजे काय संतांची टोळी नाही!’ असे विधान शरद पवार यांनी केले.
Next
>कराड (जि़ सातारा) : ‘मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण दिले म्हणून विरोधकांनी टीका करण्याची गरज नाही. मागणी होती म्हणून दिले आहे. निवडणुकीत त्याचा फायदा होईलही, ताकाला जाताना भांडं लपवायची आमची पद्धत नाही. शेवटी राष्ट्रवादी म्हणजे काय संतांची टोळी नाही!’ असे खळबळजनक विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी येथे केले.
यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगावी देवराष्ट्रे येथील कार्यक्रमाला जाण्यापूर्वी पवारांनी कराड येथे पत्रकारांशी संवाद साधला.
मराठा आणि मुस्लीम समाजाला निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आरक्षण दिल्याचा आरोप होत आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता पवारांनी वरील विधान केले. आरक्षणाच्या निर्णयाचा निवडणुकीत फायदा होईल, असे सूचक विधान करून त्यांनी जणू निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणोशाच केला. पुणो पदवीधर मतदारसंघातील पराभवाबद्दल पवार म्हणाले, ‘आमच्यातील बंडखोरीमुळे हा पराभव झाला आहे. आपण बंडखोरांचे ‘लाड’ पुरवणा:यांवर काय कारवाई करणार का, यावर ‘मी तुम्हाला का सांगू,’ असा प्रतिप्रश्न केला. विधानसभा निवडणुकीत अशी बंडाळी होणार काय, असे विचारल्यावर ‘ज्या-त्या वेळी बघू,’ असे उत्तर दिले.
मोदी सरकारच्या एक महिन्याच्या कारभाराबाबत बोलताना ते म्हणाले की, इतक्यात प्रतिक्रिया देणो घाईचे ठरेल. त्यांना काम करायला संधी तर द्यायला पाहिजे, पण ते आपल्या निर्णयावर ठाम न राहता धरसोड करतात, असेच सध्या म्हणावे लागेल.
‘लिंगायत’ आरक्षणासाठी केंद्राकडे प्रस्ताव : ‘मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला; मग लिंगायत समाजाच्या आरक्षणाचे काय?’ या मागणीकडे लक्ष वेधले असता त्यांच्या आरक्षणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे पवारांनी सांगितले. (वार्ताहर)
मुख्यमंत्री बदलाची मागणी नाही
मुख्यमंत्री कोण असावं, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना बदलावे, अशी मागणी करण्याचा आमचा प्रश्नच नाही. पण, उलट काँग्रेसमधीलच नेते यासंदर्भात आपल्याला भेटले,’ अशी गुगलीही टाकली. ‘मुख्यमंत्र्यांच्या कामावर समाधानी आहात काय,’ या प्रश्नाचं उत्तर देणंही खुबीनं टाळलं.
सोशल मीडियाकडे दुर्लक्ष केल्याची किंमत मोजतोय
सोशल मीडिया संवाद साधण्यासाठी एक चांगले माध्यम आहे. आम्ही याकडे दुर्लक्ष केले त्याची किंमत आम्ही आज मोजत आहोत. यापुढे तुम्ही या माध्यमाकडे दुर्लक्ष करू नका,’ असे आवाहन शरद पवार यांनी केले. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील तरुण कार्यकत्र्यासाठी आयोजित ‘सोशल मीडिया’वरील कार्यशाळेत ते बोलत होते.
‘उदयन’राजेंची भूमिका आमचीच!
‘मुख्यमंत्री बदलासाठी राष्ट्रवादीचा आग्रह आहे, असं म्हणतात; पण राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तर पृथ्वीराज चव्हाण यांचे कौतुक केले आहे,’ असे सांगताच ‘तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे. उदयनराजेंची भूमिका तीच राष्ट्रवादीची भूमिका,’ असा खुलासाही पवारांनी केला.