लॉकडाऊनमध्ये ८० कुटुंबांनी फुलविली नैसर्गिक परसबाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:25 AM2021-04-20T04:25:40+5:302021-04-20T04:25:40+5:30
कोल्हापूर : गतवर्षी लॉकडाऊनमध्ये वसुंधरा दिनानिमित्त निसर्ग मित्र परिवाराने घेतलेल्या नैसर्गिक परसबाग फुलवा स्पर्धेत तब्बल ८० कुटुंबांनी सहभाग घेतला. ...
कोल्हापूर : गतवर्षी लॉकडाऊनमध्ये वसुंधरा दिनानिमित्त निसर्ग मित्र परिवाराने घेतलेल्या नैसर्गिक परसबाग फुलवा स्पर्धेत तब्बल ८० कुटुंबांनी सहभाग घेतला. या काळात या कुटुंबातील सदस्यांनी आपापल्या परसबागेत अनेक प्रकारच्या ओषधी वनस्पती, भाज्या, पालेभाज्या, फळे, फुले, शोभिवंत झाडांची लागवड केली. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, सर्व विजेत्यांना कचरा व्यवस्थापनाची निसर्गाचे देणे पेटी व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.
निसर्गमित्र संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष २०२० आणि २२ एप्रिल रोजीच्या वसुंधरा दिनानिमित्त ऑनलाईन पद्धतीने वार्षिक नैसर्गिक परसबाग फुलवा स्पर्धा आयोजित केली होती. २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात लोकांनी घरी राहून अनेक छंद जोपासावेत, तसेच घरबसल्या निसर्गाशी मैत्री व्हावी आणि लॉकडाऊन काळात मानसिक मनोबल वाढण्यासाठी या स्पर्धाचे आयोजन केले होते.
कोणी घराच्या बाल्कनीत, अंगणात, तर कोणी गच्चीवर बाग फुलविली. अनेकांनी गाडीच्या टायर, ड्रम, फुटलेले डबे, रंगकामातून उरलेले डबे यांचा वापर करून आकर्षक आणि रोपनिर्मिती केली. या काळात या कुटुंबातील सदस्यांनी आपापल्या परसबागेत अनेक प्रकारच्या ओषधी वनस्पती, भाज्या, पालेभाज्या, फळे, फुले, शोभिवंत झाडांची लागवड केली. या स्पर्धेला ग्रामीण तसेच शहरी भागातून भरघोस प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे परीक्षण संस्थेचे सदस्य पराग केमकर, मोहन जाधव, अनिल चौगुले यांनी स्पर्धकांच्या घरी जाऊन केले.
स्पर्धेचा निकाल असा :
अंगणातील बाग : सुभाष धर्माधिकारी (प्रथम), श्रद्धा भणगे (द्वितीय), संतोष भोसले (तृतीय)
गच्चीवरची बाग : अभय कोटणीस (प्रथम), नरेंद्र भद्रापुरे (द्वितीय), विजय घेरे (तृतीय)
परसबाग : अमित गाट (प्रथम), कर्नल अमरसिंह सावंत (दवितीय), दिलीप खराडे (तृतीय)
------------------------------------------------------------
(बातमीदार : संदीप आडनाईक)
फोटो : 19042021-kol-Parsbagफोटो ओळी : गतवर्षी लॉकडाऊनमध्ये वसुंधरा दिनानिमित्त निसर्ग मित्र परिवाराने घेतलेल्या नैसर्गिक परसबाग फुलवा स्पर्धेत अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती, भाज्या, पालेभाज्या, फळे, फुले, शोभिवंत झाडांची लागवड केली.
===Photopath===
190421\19kol_3_19042021_5.jpg
===Caption===
फोटो : 19042021-kol-Parsbagफोटो ओळी : गतवर्षी लॉकडाउनमध्ये वसुंधरा दिनानिमित्त निसर्ग मित्र परिवाराने घेतलेल्या नैसर्गिक परसबाग फुलवा स्पर्धेत अनेक प्रकारच्या ओषधी वनस्पती, भाज्या, पालेभाज्या, फळे, फुले, शोभिवंत झाडांची लागवड केली.