निसर्गमित्रकडून गिरगांवच्या शाळेस २५ वनौषधी रोपांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:27 AM2021-08-12T04:27:32+5:302021-08-12T04:27:32+5:30
कोल्हापूर : जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाज्या संवर्धन उपक्रमात निसर्गमित्र संस्थेमार्फत गिरगांव येथील कै. श्रीमती बी. के. पाटील हायस्कूलच्या आवारात ...
कोल्हापूर : जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाज्या संवर्धन उपक्रमात निसर्गमित्र संस्थेमार्फत गिरगांव येथील कै. श्रीमती बी. के. पाटील हायस्कूलच्या आवारात वेगवेगळ्या २५ वनौषधी रोपांची लागवड करण्यात आली तर निसर्गभ्रमंतीमध्ये विविध रानभाज्या आढळून आल्या. यावेळी काही आदर्श सहेली मंचच्या सदस्यांनी रानभाज्यांच्या पाककृती सादर केली.
कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेमार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी अनिल चौगुले यांनी ‘निसर्ग व मानव’ या विषयावर माहिती दिली आणि प्रत्येकाने आपल्या परसबागेमध्ये वनऔषधीचे रोप लावावे, असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी गिरगांवचे सरपंच महादेव कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच माधवराव कुरणे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील, शरद पवार, शेखर सुतार आणि मोहन जाधव उपस्थित होते. यावेळी कस्तुरी जाधव या विद्यार्थिनीने कुरडू, भारंगी या रानभाजीचा तयार केलेला बुके मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आला.
प्रास्ताविक मुख्याध्यापक के. बी. चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन हरित सेनेचे समन्वयक जे. एन. कुंभार यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन अभय कोतनीस, सुनील चौगुले, शिवतेज पाटील, प्रथम चोगुले, शोएब शेख, यश चौगुले यांनी केले. एस. डी. गायकवाड यांनी आभार मानले.
शाळेच्या परिसरात वृक्षारोपण
यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी निसर्गमित्रचे युवा सदस्य भारत सुनील चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी बेल, आपटा, कांचन, शमी, पुत्रजीवी, जांभूळ, रत्नगुंज,शेंद्री, हादगा, टाकळी, मायाळू इ. वनऔषधी, रंग देणारे वृक्ष, रानभाज्याची झुडपे, वेलींचा समावेश असलेल्या २५ वनऔषधी रोपे शाळेस भेट देण्यात आले. त्याचे मान्यवरांच्या हस्ते व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
निसर्गभ्रमंतीत आढळल्या रानभाज्या
गिरगाव परिसरातील रानावनात करण्यात आलेल्या निसर्गभ्रमंतीमध्ये मोरशेंड, काटेकोळशिंदा, नाल, कुर्डू, वाघाटी, भारंगी, पात्री, टाकाळा, आघाडा, केना, चिचूर्डी, भोकर, बांबू, कानफुटी रानपोकळा, गुळवेल आदी रानभाज्या आढळून आल्या. यावेळी काही आदर्श सहेली मंचच्या कस्तुरी अलका जाधव, अस्मिता आशाताई चौगुले या महिलांनी रानभाज्यांची पाककृतीची प्रात्यक्षिके दाखविली.
--------------------------------
फोटो : 10082021-Kol-Nisargmitr vrukhsaropan.jpg
फोटो ओळ : निसर्गमित्र संस्थेमार्फत गिरगांव येथील बी. के. पाटील हायस्कूलच्या आवारात वेगवेगळ्या २५ वनौषधी रोपांची लागवड करण्यात आली.
10082021-Kol-Nisargmitr vrukhsaropan1.jpg
फोटो ओळ : निसर्गमित्र संस्थेमार्फत गिरगांव येथील बी. के. पाटील हायस्कूलच्या आवारात कस्तुरी जाधव या विद्यार्थिनीच्या हस्ते वनौषधी रोपांची लागवड करण्यात आली.
100821\10kol_6_10082021_5.jpg~100821\10kol_7_10082021_5.jpg
फोटो : 10082021-Kol-Nisargmitr vrukhsaropan.jpgफोटो ओळ : निसर्गमित्र संस्थेमार्फत गिरगांव येथील बी. के. पाटील हायस्कूलच्या आवारात वेगवेगळ्या २५ वनौषधी रोपांची लागवड करण्यात आली. ~10082021-Kol-Nisargmitr vrukhsaropan1.jpgफोटो ओळ : निसर्गमित्र संस्थेमार्फत गिरगांव येथील बी. के. पाटील हायस्कूलच्या आवारात कस्तुरी जाधव या विद्यार्थिनीच्या हस्ते वनौषधी रोपांची लागवड करण्यात आली.