नववीच्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलणार

By admin | Published: May 21, 2015 11:31 PM2015-05-21T23:31:34+5:302015-05-22T00:10:27+5:30

आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात : यावर्षीपासूनच होणार अंमलबजावणी, प्रश्नपत्रिकेऐवजी ‘कृतिपत्रिका’ संबोधले जाणार

The nature of question papers of Ninth language will change | नववीच्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलणार

नववीच्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलणार

Next

भरत शास्त्री- बाहुबली --शालेय जीवनात घोकमपट्टीऐवजी कृतिशील शिक्षणाबाबत शासन आग्रही आहे. मुलांचा मानसिक, बौद्धिक व भाषिक विकास झाला पाहिजे, या दृष्टीने आगामी शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून इयत्ता नववीच्या सर्व भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच याबाबत शाळांना कळविले जाणार आहे.
सध्याच्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये घोकमपट्टी व पाठांतरावर आधारित प्रश्नावली आहेत. त्यामध्ये मुलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. स्वत:चे भाषिक कौशल्य दाखवण्याचे व मत मांडण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे मुलांचा भाषा विषयाबद्दल भाषिक वैचारिक विकास होताना दिसत नाही. चाकोरीबद्ध प्रश्न व त्याची ठरलेली उत्तरे, असेच सध्याचे स्वरूप आहे. या सर्व पारंपरिक पद्धती बंद करून कृतियुक्त शिक्षणावर शासनाने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे इयत्ता नववीच्या सर्व भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपांमध्ये बदल. सुधारित कृतिपत्रिकेमध्ये वाचन, लेखन, ज्ञान, उपयोजन, आकलन, अनुवाद, विश्लेषण, संश्लेषण, स्मरण व रसग्रह या कौशल्यांचा अंतर्भाव केला आहे. शिवाय कृतिपत्रिकेमध्ये विविध विभागांच्या माध्यमातून बुद्धीला चालना देणारे, स्वप्रतिसादात्मक बौद्धिक, मानसिक व भाषिक विकासात्मक, अशा कृतियुक्त प्रश्नांचा समावेश असणार आहे. यामध्ये विविध प्रकारचे चार्ट व तक्त्यांचाही समावेश केला गेला आहे.
सध्या प्रचलित दहावी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे स्वरूप असणार आहे. यामुळे घोकमपट्टी थांबेलच, शिवाय कॉपीला आळा बसेल, असा विश्वास राज्य शिक्षण मंडळाला आहे. या बदलाच्या अनुषंगाने सर्व भाषा विषयांच्या अध्ययन-अध्यापन पद्धतीबाबत मानसिकता बदलणे गरजेचे आहे.


प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्याचे काम जानेवारीपासून सुरू आहे. प्रातिनिधिक काही मुले व शिक्षकांचा सर्व्हे करूनच बदल करण्यात येत आहेत. भाषा विषयांमध्येदेखील कृतियुक्त व मुलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला चालना मिळावी, हीच अपेक्षा आहे.
- प्राची साठे, विशेष कार्यकारी अधिकारी, शालेय शिक्षण विभाग,
शिक्षणमंत्री कार्यालय, मुंबई



नववीची प्रश्नपत्रिका
बोर्ड पुरविणार ?
प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातील बदलांवर पुढील काही वर्षांत बोर्ड संपूर्ण राज्याला नववीची प्रश्नपत्रिका (कृतिपत्रिका) पुरविण्याची शक्यता आहे; परंतु पेपर तपासण्यापासून निकाल देण्यापर्यंतचे संपूर्ण काम ज्या-त्या शाळेचे पूर्वीप्रमाणेच असेल.


ठळक वैशिष्ट्ये
पाठ्यपुस्तक जुनेच असणार
प्रश्नपत्रिका १० ते १२ पानांची होणार
सन २०१५-१६ ला नववीमध्ये बदल
सन २०१६-१७ पासून
१० वी परीक्षेत बदल

Web Title: The nature of question papers of Ninth language will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.