संजय घाटगे यांचा स्वभाव डंख मारण्याचा

By admin | Published: July 27, 2014 12:47 AM2014-07-27T00:47:38+5:302014-07-27T01:11:40+5:30

हसन मुश्रीफ यांची टीका : कागलमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस मेळावा

The nature of Sanjay Ghatge's stance | संजय घाटगे यांचा स्वभाव डंख मारण्याचा

संजय घाटगे यांचा स्वभाव डंख मारण्याचा

Next

कागल : सत्य कधी झाकले जात नाही. अंतिम विजय सत्याचाच होतो. सलग तीन वेळा सत्याचाच विजय झाला आहे. संजय घाटगे यांना भाबडेपणाने मी मदत केली; पण त्यांचा स्वभाव डंख मारण्याचा आहे. जनतेने याचा आता फैसला करावा, असे आवाहन जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा येथील अलका शेती फार्मवर झाला, तेव्हा ते बोलत होते. अध्यक्षस्थानी युवराज पाटील होते. मेळाव्यास एस. टी. महामंडळाचे संचालक ए. वाय. पाटील, गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, कागलच्या नगराध्यक्षा आशाकाकी माने, मुरगूडच्या नगराध्यक्षा माया चौगुले, किरण कदम, वसंतराव धुरे, नवीद मुश्रीफ, आदींसह मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंश्री मुश्रीफ म्हणाले की, राजकारण करताना सर्वस्व झोकून देऊन राजकारण केले. कोणाची फसवणूक केली नाही. ३० हजार लोकांनी साखर कारखान्यासाठी ३० कोटी रुपये माझ्याकडे दिले आहेत. जनतेसमोर मते मागण्यासाठी जात असताना नैतिकता लागते. ती संजय घाटगे यांच्याकडे नाही. जे कधीच खरे बोलले नाहीत ते संजय घाटगे आता म्हणतात, विक्रमसिंहराजेंचं सगळं मीच केलं आहे. हे ऐकून राजेंचीही करमणूक होत असेल.
भैया माने यांनी स्वागत केले. संजय हेगडे, अजित कांबळे, शीलाताई जाधव, प्रा. डी. डी. चौगुले, वसंतराव धुरे, शिवाजी खोत, सतीश पाटील, आदींची भाषणे झाली. तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी आभार मानले.
 

Web Title: The nature of Sanjay Ghatge's stance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.