नाट्यपरिषदेतर्फे शुक्रवारपासून नाट्यमहोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:24 AM2021-03-10T04:24:40+5:302021-03-10T04:24:40+5:30
कोल्हापूर : हौशी रंगकर्मींना प्रोत्साहन देम्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतर्फे शुक्रवार व शनिवारी (दि. १२ व १३) मनोहर कुईगडे ...
कोल्हापूर : हौशी रंगकर्मींना प्रोत्साहन देम्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतर्फे शुक्रवार व शनिवारी (दि. १२ व १३) मनोहर कुईगडे स्मृती हौशी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात दिलीप गुणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यानंतर इरफान मुजावरलिखीत ‘शेवट तितका गंभीर नाही’ व राहुल सडोलीकरलिखीत ‘जंगल जंगल बटा चला है’ या दोन एकांकिका सादर होणार आहे. या दोन्ही एकांकिकांनी राज्यातील विविध स्पर्धांमध्ये पारितोषिकांची लटलूट केली आहे. शनिवारी परिवर्तन कला फौंडेशननिर्मित ‘ऱ्हासपर्व’ या नाटकाचा विशेष प्रयोग होणार आहे. विद्यासागर अध्यापकलिखित व किरणसिंह चव्हाण दिग्दर्शित या नाटकाने २०१८ ज्या राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत द्वितीय क्रमांक मिळविला तसेच विविध पारितोषिकांवर मोहर उमटवली. समारोपादिवशी नाट्यनिर्माते दिलीप जाधव उपस्थित असतील. हा महोत्सव विनामूल्य असून मोफत प्रवेशिका उद्या, गुरुवारपासून नाट्यगृहावर उपलब्ध असतील, तरी रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष आनंद कुलकर्णी व प्रमुख कार्यवाह गिरीश महाजन यांनी केले आहे.
--
फोटो नं ०९०३२०२१-कोल-ऱ्हासपर्व
--