देवल क्लबमध्ये रसिकांच्या प्रतिसादात नाट्यसंध्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:15 AM2021-02-05T07:15:42+5:302021-02-05T07:15:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गायन समाज देवल क्लबमध्ये आयोजित नाट्यसंध्या कार्यक्रम रसिकांच्या प्रतिसादात पार पडला. यावेळी ‘जंगल जंगल ...

Natyasandhya in response to the audience at Deval Club | देवल क्लबमध्ये रसिकांच्या प्रतिसादात नाट्यसंध्या

देवल क्लबमध्ये रसिकांच्या प्रतिसादात नाट्यसंध्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गायन समाज देवल क्लबमध्ये आयोजित नाट्यसंध्या कार्यक्रम रसिकांच्या प्रतिसादात पार पडला. यावेळी ‘जंगल जंगल बटा चला है’ व ‘काय राव’ या दोन एकांकिका सादर करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे उद्घाटन क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते व सचिन पुरोहित, राजेंद्र पित्रे, सुबोध गद्रे, उमा नामजोशी, किरणसिंह चव्हाण व माणिक खोत यांच्या उपस्थितीत झाले. पहिल्या सत्रात परिवर्तन कला फाउंडेशनच्या वतीने ‘जंगल जंगल बटा चला है’ ही एकांकिका सादर करण्यात आली. याचे लेखन राहुल सडोलीकर व दिग्दर्शन किरणसिंह चव्हाण यांनी केले. दुसऱ्या सत्रात देवल क्लबच्या वतीने सुदर्शन खोतलिखित व दिग्दर्शित ‘काय राव’ ही एकांकिका सादर करण्यात आली. यात निहाल रुकडीकर, ओंकार साळोखे, विजयालक्ष्मी कुंभार, पार्थ घोरपडे, यश शिंदे यांनी अभिनय सादर केला.

---

जी. कांबळे आर्ट गॅॅलरीतर्फे बक्षीस वितरण

कोल्हापूर : येथील कलायोगी जी. कांबळे सार्वजनिक आर्ट गॅलरीतर्फे बालकल्याण संकुलमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक व अध्यक्षस्थानी संस्थेच्या कार्यवाह पद्मजा तिवले होत्या.

या स्पर्धेत लहान, मोठा व खुला गट या विभागातून १२ विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावले. रियाज शेख यांनी प्रास्ताविक केले. शांताराम कांबळे यांनी आभार मानले. तुकाराम कदम यांनी चित्रांचे परीक्षण केले.

--

Web Title: Natyasandhya in response to the audience at Deval Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.