ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीबाबत नविद मुश्रीफांचा मोठा निर्णय, म्हणाले..

By राजाराम लोंढे | Published: July 29, 2022 01:22 PM2022-07-29T13:22:19+5:302022-07-29T13:23:11+5:30

मतदारसंघ राखीव झाल्याने सगळ्यांचीच काेंडी. मुश्रीफ यांना कसबा सांगाव, सेनापती कापशी मतदारसंघ हे पर्याय असले तरी ते लढणार नाहीत.

Navid Hasan Mushrif will not contest Zilla Parishad elections | ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीबाबत नविद मुश्रीफांचा मोठा निर्णय, म्हणाले..

ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीबाबत नविद मुश्रीफांचा मोठा निर्णय, म्हणाले..

Next

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे संचालक नविद हसन मुश्रीफ हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहणार आहेत. कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अंबरिश घाटगे यांचा पारंपरिक मतदारसंघही राखीव झाल्याने त्यांचीही गोची झाली आहे.

कागल तालुक्यातील राजकारण हे गटाभोवतीच फिरत असते. त्यातही जिल्हा परिषदेची निवडणूक आली की नविद मुश्रीफ, अंबरीष घाटगे व विरेंद्र मंडलीक यांच्या नावांची चर्चा सुरु होते. या तिघांनीही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आहे. कागलमधील सिध्दनेर्ली, बोरवडे, चिखली हे मतदारसंघ राखीव झाल्याने सगळ्यांचीच काेंडी झाली आहे. मुश्रीफ यांना कसबा सांगाव, सेनापती कापशी मतदारसंघ हे पर्याय असले तरी ते लढणार नाहीत. या मतदारसंघातून कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.


सेनापती कापशी व कसबा सांगाव हे मतदारसंघ खुले असले तरी तेथून कार्यकर्त्यांनाच संधी देणार आहे. आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवणार नाही. - नविद मुश्रीफ.

Web Title: Navid Hasan Mushrif will not contest Zilla Parishad elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.