Navratri : अंबाबाईची ओमकाररूपिणी स्वरूपात पूजा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 06:54 PM2020-10-20T18:54:42+5:302020-10-20T18:56:29+5:30

Navratri, AmbabaiTemple, kolhapurnews शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला मंगळवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची ओमकाररूपिणी स्वरूपात पूजा बांधण्यात आली. बुधवारी ललितापंचमीनिमित्त अंबाबाईची पालखी सखी त्र्यंबोलीदेवीच्या भेटीला जाणार आहे. येथे कुमारिका पूजन व कोहळाछेदन विधी होणार आहेत.

Navratri: Worship of Ambabai in the form of Omkar | Navratri : अंबाबाईची ओमकाररूपिणी स्वरूपात पूजा 

शारदीय नवरात्रौत्सवात चौथ्या माळेला मंगळवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची ओमकाररूपिणी स्वरूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा मकरंद मुनीश्वर व माधव मुनीश्वर यांनी बांधली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

googlenewsNext
ठळक मुद्देअंबाबाईची ओमकाररूपिणी स्वरूपात पूजा ललितापंचमीनिमित्त अंबाबाईची पालखी सखी त्र्यंबोलीदेवीच्या भेटीला जाणार

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला मंगळवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची ओमकाररूपिणी स्वरूपात पूजा बांधण्यात आली. बुधवारी ललितापंचमीनिमित्त अंबाबाईची पालखी सखी त्र्यंबोलीदेवीच्या भेटीला जाणार आहे. येथे कुमारिका पूजन व कोहळाछेदन विधी होणार आहेत.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख देवता श्री अंबाबाईच्या दुपारच्या आरतीनंतर करवीरमाहात्म्य या ग्रंथावर आधारित तिची सालंकृत पूजा बांधण्यात आली. चतुर्थीला श्री अंबाबाईच्या सहस्रनामस्तोत्रानुसार ही पूजा आहे. मार्कंडेय ऋषी आणि नारदमुनी यांच्या संवादातून सनत्कुमारांनी सांगितलेल्या अंबाबाईच्या सहस्रनामांचे विवेचन यात केले आहे. सनत्कुमार योगिजनांनी देवीची हजार नावे सांगितली आहेत. ही पूजा मकरंद मुनीश्वर व माधव मुनीश्वर यांनी बांधली.

अंबाबाईच्या नवरात्रौत्सवात ललितापंचमीला देवीची उत्सवमूर्ती पालखीत विराजमान होऊन आपल्या लवाजम्यानिशी आपली सखी त्र्यंबोलीदेवीच्या भेटीला जाते. येथे छत्रपतींकडून गुरव घराण्यातील कुमारिकेचे पूजन होते. तिच्या हस्ते कोहळाछेदनाचा विधी होतो. यंदा कोरोनामुळे देवीची पालखी सजविलेल्या वाहनातून नेण्यात येणार आहे.


 

Web Title: Navratri: Worship of Ambabai in the form of Omkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.