Navratri2022: जोतिबाची पाच कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 02:36 PM2022-09-28T14:36:33+5:302022-09-28T18:36:43+5:30

तिसऱ्या माळेला जोतिबा दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

Navratri2022: Jotiba Mahapuja decorated in five lotus flower petals | Navratri2022: जोतिबाची पाच कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा

Navratri2022: जोतिबाची पाच कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा

Next

दत्तात्रय धडेल

जोतिबा : नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला जोतिबाची पाच कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधण्यात आली.  सोहन कमळातील महापूजा श्रीचे पुजारी देवराज मिटके, अदिनाथ लादे, महादेव झूगर, शिवाजी बनकर, आकाश ठाकरे, गजानन लादे, महालिंग बनकर यांनी बांधली. तिसऱ्या माळेला जोतिबा दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.

सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला. उंट, घोडे, वाजंत्री देव सेवक श्री चे पुजारी सह नवरात्र उपासकाचा लवाजमा सहभागी झाला होता. नवरात्रोत्सवात सलग दहा दिवस हा धुपारती सोहळा निघतो. तेल अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी झाली होती. दर्शन मंडपमध्ये भाविकांच्या दर्शन रांगा लागल्या होत्या.

दर्शन रांग नियंत्रणासाठी कोडोली पोलीस स्टेशनचे पोलिस, देवस्थान समितीचे कर्मचारी व सुरक्षा रक्षक, जोतिबा पुजारी समितीचे कर्मचारी, स्थानिक पुजारी तैनात होते. एस.टी. महामंडळाने जादा गाडयाची सोय केली. तेल, नारळ मेवा मिठाईची मोठी उलाढाल होत आहे.

Web Title: Navratri2022: Jotiba Mahapuja decorated in five lotus flower petals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.