राष्ट्रवादीचा कार्यक्रमावर बहिष्कार

By admin | Published: November 18, 2014 11:55 PM2014-11-18T23:55:42+5:302014-11-19T23:14:43+5:30

बालस्वच्छता अभियान : पत्रिकेतून ज्येष्ठ नगरसेवकांचे नाव वगळले

NCP boycotted program | राष्ट्रवादीचा कार्यक्रमावर बहिष्कार

राष्ट्रवादीचा कार्यक्रमावर बहिष्कार

Next

इचलकरंजी : नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने आयोजित बालस्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमपत्रिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक यांचे नाव वगळण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कार्यक्रमावरच बहिष्कार टाकला. दोन्ही कॉँग्रेसच्या सत्तारूढ आघाडीपैकी फक्त कॉँग्रेसचेच नगरसेवक व नगरसेविका या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपालिकेच्या बालवाडीकडील लहान मुलांसाठी राजीव गांधी भवनमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी उपक्रम आयोजित केला होता. महिला व बालकल्याण समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या उपक्रमाच्या कार्यक्रम पत्रिका छापताना कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, गटनेते बाळासाहेब कलागते, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद रवींद्र माने, शहर विकास आघाडीचे अजित जाधव, विरोधी पक्षनेते जयवंत लायकर, सभापती महेश ठोके, चंद्रकांत शेळके, आदींची नावे वापरण्यात आली होती; पण जांभळे यांचे नाव वगळले. परिणामी, या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिला होता.
दरम्यान, लहान मुलांना या उपक्रमामध्ये पालिकेच्या आयजीएम इस्पितळाकडील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सूर्यवंशी व त्यांच्या पथकांनी मार्गदर्शन केले. यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रमिला जावळे यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी, बालवाडी विभागाकडील शिक्षिका, आदी उपस्थित होते. कार्यक्रम सत्तारूढ कॉँग्रेसने उरकला असला तरी राष्ट्रवादीच्या बहिष्काराचीच चर्चा आज दिवसभर नगरपालिका क्षेत्रात होती. (प्रतिनिधी)

Web Title: NCP boycotted program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.