भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यास राष्ट्रवादी बांधील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:28 AM2021-08-20T04:28:15+5:302021-08-20T04:28:15+5:30
कोल्हापूर : भटके, विमुक्त समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस कटिबध्द राहिल, अशी ग्वाही देतानाच सर्व समाजाचा एकत्रित जिल्हा ...
कोल्हापूर : भटके, विमुक्त समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस कटिबध्द राहिल, अशी ग्वाही देतानाच सर्व समाजाचा एकत्रित जिल्हा मेळावा घेऊन प्रश्न सुटण्यासाठी रूपरेषा तयार करू, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी आश्वासित केले.
राष्ट्रवादीच्या भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलचा मेळावा गुरुवारी मार्केट यार्ड येथील कार्यालयात झाला. यावेळी ए.वाय. पाटील बोलत होते. भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनील भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
ए.वाय. पाटील म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस कायमच वंचिताच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. भटके विमुक्त जमाती सेलच्या माध्यमातून या समाजाचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भविष्यात याचा आणखी विस्तार केला जाईल. प्रा. भोसले यांनीही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाही भटक्या समाजाला न्याय मिळालेला नाही, अशी खंत व्यक्त करताना सर्व भटक्या समाजाने राष्ट्रवादीच्या पाठीशी ठाम राहाण्याचे आवाहन केले.
कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी एकमेव कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या माध्यमातून सर्व भटक्या जाती-जमातींना संघटित करण्याचे काम झाले आहे. राज्याला आदर्शवत, असे या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या या कार्यामुळेच प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील या संघटनाबद्दल जिल्हाध्यक्ष कृष्णात पुजारी यांचे सर्वच वक्त्यांनी कौतुक केले.
स्वागत महादेव सनगर यांनी केले. बळवंत पोवार, विजय डवरी, तानाजी रानगे, आप्पाजी चाळुचे यांचीही भाषणे झाली. यावेळी जिल्हा कार्यकारिणी व तालुका पदाधिकारी निवडीच्या पत्रांचे वाटप झाले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता हजारे, बाळासाहेब देशमुख, यासीन मुजावर, नेहाल कलावंत, गबरू गावडे, जयवंत नाईक, लक्ष्मण गोरडे, अनिल हजारे, बाबू जांभळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो: १९०८२०२१-कोल-एनसीपी
फोटो ओळ: राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती व जमाती सेलच्या पदाधिकारी निवडीच्या पत्रांचे वाटप जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी अनिल साळोखे, कृष्णात पुजारी, दत्ता हजारे उपस्थित होते.