तुमच्या मागे ‘ईडी’ लागली की ‘खोकी’ मिळाली?, व्ही.बी. पाटीलांचा आमदार राजेश पाटीलांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 01:05 PM2023-07-17T13:05:00+5:302023-07-17T13:05:31+5:30

डिपॉझिट जप्त करून जनताच तुम्हाला धडा शिकवेल

NCP District President V.B. Patil criticism of MLA Rajesh Patil | तुमच्या मागे ‘ईडी’ लागली की ‘खोकी’ मिळाली?, व्ही.बी. पाटीलांचा आमदार राजेश पाटीलांवर हल्लाबोल

तुमच्या मागे ‘ईडी’ लागली की ‘खोकी’ मिळाली?, व्ही.बी. पाटीलांचा आमदार राजेश पाटीलांवर हल्लाबोल

googlenewsNext

गडहिंग्लज : तुमच्या मागे ‘ईडी’ लागली आहे का? तुम्ही ज्यांना साथ दिली, त्यांनी गोकुळ, गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत तुमची काय अवस्था केली होती? तुम्हाला कोणती अडचण होती, त्यामुळे तुम्ही शरद पवारांचे विचार सोडले. दिवंगत मंडलिक व नरसिंगरावांशी असलेली निष्ठाही तुम्ही सोडलात. तुम्हालाही खोकी मिळाली का? डिपॉझिट जप्त करून जनताच तुम्हाला धडा शिकवेल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी आमदार राजेश पाटील यांना दिला.

येथील नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित शरद पवार समर्थकांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. माजी आमदार राजीव आवळे, आर.के. पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजीव आवळे म्हणाले, मिरजेच्या दंगलीमुळे अनेकांचा राजकीय बळी गेला, परंतु त्यातूनही मुश्रीफ तरले ते केवळ शरद पवारांमुळेच. पवारांमुळेच ते श्रावणबाळ, महाडॉक्टर झाले. त्यांनी आता जनतेला गृहित धरू नये.

अमर चव्हाण म्हणाले, यशवंतराव चव्हाण, वसंतदादांचा महाराष्ट्र शाबूत ठेवण्यासाठी शरद पवारांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे.

आर.के. पोवार म्हणाले, दिल्लीतील बदमाशाच्या मागे गेलेल्यांना कोल्हापूरची जनताच नक्की धडा शिकवेल.

याप्रसंगी शिवाजी खोत, नितीन जांभळे, अनिल घाटगे, गोविंद पाटील, बी.डी. पाटील, आनंदा जाधव, शिवाजी माने, कार्तिक कोलेकर, बसवराज नंदगावे, संजय नाईक, लखन बेनाडे, अंकुश रणदिवे, गणपतराव पट्टणकुडी यांनीही मनोगत व्यक्त केले.

मेळाव्यास राजेंद्र मांडेकर, उदय चव्हाण, शिवाजी राऊत, बाबूराव माने, शिवाजी सावंत, भैरू खांडेकर, रवींद्र पाटील, रोहित पाटील आदींसह गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यांतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व महिला उपस्थित होते. शिवप्रसाद तेली यांनी स्वागत केले. बाळासाहेब महाडिक यांनी आभार मानले.

Web Title: NCP District President V.B. Patil criticism of MLA Rajesh Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.