राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ आज भूमिका स्पष्ट करणार
By विश्वास पाटील | Published: March 13, 2023 11:06 AM2023-03-13T11:06:13+5:302023-03-13T11:07:45+5:30
शनिवारी सकाळी त्यांच्या कागल मधील निवासस्थानी ईडीच्या पथकाने तिसऱ्यांदा छापा टाकला.
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ आज सोमवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन ईडीच्या कारवाई संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
शनिवारी सकाळी त्यांच्या कागल मधील निवासस्थानी ईडीच्या पथकाने तिसऱ्यांदा छापा टाकला. तेव्हापासून आमदार मुश्रीफ हे नॉट रिचेबल होते. त्यांना आज ईडीने मुंबई कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. त्यामुळे ते काय करतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असताना आज सकाळी ते निवासस्थानी परतले.
त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गराडा घातला..वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीची झुंबड उडाली पण त्यांनी कांही बोलण्यास नकार दिला. मी दुपारी ४ वाजता भूमिका मांडेन असे सांगून ते घरात निघून गेले.
पुन्हा छापा
आमदार मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, ब्रिक्स कंपनीतील व्यवहारावरून ‘ईडी’ च्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे. शनिवारी सकाळी दहा गाड्यांतून सुमारे २४ जणांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले होते. त्यापैकी बारा जणांनी मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी छापा टाकला. दुपारी साडेबारापर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर त्यातील सहा जण तेथून निघून गेले.