शरद पवारांची अन् भाजपची जवळीक आहे का? आमदार रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 04:35 PM2023-01-27T16:35:34+5:302023-01-27T16:58:16+5:30
वंचित बहुजन आघाडीची आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची युती झाली आहे. काही दिवसापासून या संदर्भात चर्चा सुरू होत्या. यावर अखेर एकत्र पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले.
कोल्हापूर- वंचित बहुजन आघाडीची आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची युती झाली आहे. काही दिवसापासून या संदर्भात चर्चा सुरू होत्या. यावर अखेर एकत्र पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी खासदार शरद पवार यांच्या संदर्भात एक वक्तव्य केले होते, यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, यावर आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
'खासदार शरद पवार हे भाजपचेच आहेत, पवार यांची भाजपसोबत जवळीक आहे, असं वक्तव्य केले होते, यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर कोणत्या अँगलने बोलले माहित नाही. पण, गुजरात राज्याला जेव्हा अडचण आली तेव्हा शरद पवार साहेब केंद्रात कृषीमंत्री होते, तेव्हा त्यांनी गुजरातला मदत केली आहे. तेव्हा तिथे भाजपचे राज्या होते, त्या मदतीला प्रकाश आंबेडकर जवळचे आहेत, असं म्हणत असतील तर त्यांना खासदार शरद पवार कळलेच नाहीत, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.
"आनंद दिघे ज्या खोलीत झोपले त्याचं झालं मंदिर; वर्षातून केवळ २ दिवस उघडतात"
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. 'महाराष्ट्र व्हिजन फोरम' संदर्भात ते दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. 'महाराष्ट्र व्हिजन फोरम'साठी राज्यभरातून तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत 1 लाख लोकांनी मतदान केलं असून 24 हजार लोकांनी सल्लाही दिला आहे. यामधून व्हीजन डाॅक्युमेंट आम्ही सरकारला देणार आहे, असंही रोहित पवार म्हणाले. फेब्रुवारी अखेरीस 10 लाख मतदान होईल. हा प्रकल्प ऑनलाइन सुरू केला. आता महाविद्यालयातही हा प्रकल्प सुरू केला आहे. हा अराजकीय प्लॅटफॉर्म आहे, आम्ही दिलेल्या डॉक्युमेंटवर सरकारने काम करावं, असंही पवार म्हणाले.