पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:24 AM2020-12-29T04:24:33+5:302020-12-29T04:24:33+5:30
कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी पदवीधर संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र ...
कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी पदवीधर संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकाच्या काळात पेट्रोल ७४ रुपये लिटर झाल्यानंतर, आता सत्तेवर असणाऱ्या मंडळींनी देशभर आंदोलने केली होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरेल १०९ डॉलर्स होता. आता तोच दर ३१ डॉलरपर्यंत खाली आला असताना, ९० रुपये लिटर पेट्रोल झाले आहे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ करून नरेंद्र मोदी यांचे सरकार सामान्य माणसाची लूट करत आहे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करून गॅसचे अनुदान पूर्ववत करावे.
यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहराध्यक्ष अनिल घाटगे, सुनील देसाई, अमोल जाधव, प्रा दत्ता जाधव, ॲड. प्रियांका संकपाळ आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :
राष्ट्रवादी पदवीधर संघाच्यावतीने पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
(फोटो- २८१२२०२०-कोल-राष्ट्रवादी)