राष्ट्रवादी पक्ष गरिबांची सेवा करणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:28 AM2021-08-12T04:28:38+5:302021-08-12T04:28:38+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गोरगरीब जनतेसाठी धावून जाणारा पक्ष आहे. महापुरामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटसमई ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गोरगरीब जनतेसाठी धावून जाणारा पक्ष आहे. महापुरामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटसमई पक्षाने जनतेला आधार देण्यासाठी या काळात आरोग्यविषयक योजना सुरू केल्या असून जनतेने या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. आवळी बुद्रुक येथे राष्ट्रवादी डाॅक्टर सेलच्या वतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, या शिबिरात तीनशेपेक्षा जास्त नागरिकांनी भाग घेतला.
पाटील म्हणाले, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रयत्नामुळेच बारामती पुणे येथून मोठी मदत आली असून जवळपास अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त औषधे कोल्हापूरला आली असून ती गोरगरीब जनतेसाठी पोहोच करण्यासाठी आमची यंत्रणा सक्रिय झाली आहे. तरी जिल्ह्यात विविध ठिकाणी होणाऱ्या आरोग्य शिबिरात सहभागी होऊन जिल्ह्यातील गोरगरीब जनतेने याचा लाभ घ्यावा, असे सांगितले. या शिबिरात गोकुळचे संचालक प्रा.किसन चौगले, नेताजी पाटील, भोगावतीचे माजी संचालक शिवाजीराव पाटील, विश्वास पाटील, राजू कवडे, नंदू भाऊ, महादेव कोथळकर, डी. बी. पाटील, सभापती सोनाली पाटील, माजी उपसभापती मोहन पाटील, दीपक पाटील (कांबळवाडीकर), भिकाजी एकल, आवळीचे सरपंच सर्जेराव कवडे, आणाजेचे माजी सरपंच दत्तात्रय पाटील, आनंदराव कवडे, नामदेव पोवार आदी उपस्थित होते.
फोटो
आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना ए. वाय. पाटील, प्रा.किसन चौगले, राजू कवडे, दत्तात्रय पाटील व मान्यवर.