केंद्र सरकारच्या विरोधात आज राष्ट्रवादीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:16 AM2021-07-03T04:16:49+5:302021-07-03T04:16:49+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस समितीच्या वतीने आज, शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता शिवाजी स्टेडियम येथे केंद्र सरकारच्या ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस समितीच्या वतीने आज, शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता शिवाजी स्टेडियम येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ देखिल सहभागी होणार आहेत.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ करुन सर्वसामान्य तसेच गोरगरीब जनतेचे जगणे महाग करून टाकले आहे. एकीकडे सर्वच क्षेत्रांत महागाईचे चटके बसत असताना केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न चालविला आहे. सामान्य जनता महागाईने होरपळून गेली आहे. या सरकारला जनतेबद्दल जरासुद्धा कळवळा राहिलेला नाही म्हणूनच केंद्र सरकारच्या निषेधार्थ कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जाणार आहे.
पक्षाच्यावतीने आंदोलनाच्या ठिकाणी गॅसऐवजी चुली मांडून त्यावर स्वयंपाक तयार करून तेथेच बसून कार्यकर्ते जेवण घेणार आहेत. आंदोलनात मंत्री मुश्रीफ यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार यांनी दिली.