‘राष्ट्रवादी’चा पाच जागांवर दावा विधानसभेचे राजकारण : प्रदेशाध्यक्षांची घेतली भेट; ‘उत्तर’साठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:53 AM2018-05-29T00:53:16+5:302018-05-29T00:53:16+5:30

विधानसभेची पाचवी जागा लढण्याचा निर्णय राष्टÑवादीने घेतला असून, ‘कोल्हापूर उत्तर’वर दावा केला जाणार आहे. राष्टÑवादीकडे सध्या येथून ताकदीचा उमेदवार नसला तरी ऐनवेळी

 'NCP's claim for five seats: Legislative politics; Trying to answer | ‘राष्ट्रवादी’चा पाच जागांवर दावा विधानसभेचे राजकारण : प्रदेशाध्यक्षांची घेतली भेट; ‘उत्तर’साठी प्रयत्न

‘राष्ट्रवादी’चा पाच जागांवर दावा विधानसभेचे राजकारण : प्रदेशाध्यक्षांची घेतली भेट; ‘उत्तर’साठी प्रयत्न

Next

कोल्हापूर : विधानसभेची पाचवी जागा लढण्याचा निर्णय राष्टवादीने घेतला असून, ‘कोल्हापूर उत्तर’वर दावा केला जाणार आहे. राष्टवादीकडे सध्या येथून ताकदीचा उमेदवार नसला तरी ऐनवेळी मधुरिमाराजे यांना रिंगणात उतरवून भाजपसह शिवसेनेची कोंडी करण्याची रणनीती आहे.

आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक दोन्ही काँग्रेस एकसंधपणे लढणार, हे निश्चित आहे. राष्टÑवादीने संघटनात्मक पातळीवर फेरबदल करून निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यातील पक्षाच्या शिष्टमंडळाने नुकतीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्टÑवादीची ताकद, काँग्रेसचे प्राबल्य आणि विरोधी शिवसेना-भाजपची तयारी यांची चाचपणी केली. त्यामध्ये त्यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतला.

विधानसभा निवडणुकीत दहापैकी पाच जागा राष्ट्रवादीला घेण्याची रणनीती प्रदेशाध्यक्षांची आहे. ‘चंदगड’, ‘कागल’ येथे पक्षाचे विद्यमान आमदार आहेत, ‘राधानगरी-भुदरगड’, ‘शिरोळ’मध्ये पक्षाची ताकद आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या जागा वाटपात येथे फारशी ताणाताणी होणार नाही. ‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी राष्टÑवादीचे नेते प्रयत्नशील आहेत; पण येथून काँग्रेसतर्फे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी जोरदार तयारी केल्याने पेच निर्माण होऊ शकतो. ‘करवीर’, ‘दक्षिण’ आणि ‘उत्तर’ हे शहराशेजारील तिन्ही मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास ‘राष्ट्रवादी’ तयार नाही.

‘उत्तर’मधून लढण्यास राष्टवादीकडे सध्या चेहरा तरी दिसत नाही; पण येथून माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी व राष्टÑवादीचे दिवंगत नेते दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या मधुरिमाराजे यांना राष्टÑवादीमधून उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती घराण्याबद्दल शहरात आदर आहे, त्याचाही फायदा होऊ शकतो. मधुरिमाराजे यांचे नाव काँग्रेस, भाजपकडूनही घेतले असले तरी मुळात शाहू छत्रपती यांनी अजून त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिलेला नाही. त्यांचे मन वळविण्याचे काम राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच करू शकतात. त्यामुळे हा विषय पवार यांच्या कानावर घालण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.

Web Title:  'NCP's claim for five seats: Legislative politics; Trying to answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.