आजरा साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय

By समीर देशपांडे | Published: December 1, 2023 11:13 AM2023-12-01T11:13:26+5:302023-12-01T11:13:56+5:30

थोड्याच वेळात उत्तूर ता. आजरा येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये आघाडीला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.

NCP's decision to contest Azra sugar factory election in kolhapur, hasan mushriff | आजरा साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय

आजरा साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय

समीर देशपांडे

कोल्हापूर : आपला माघारीचा निर्णय फिरवून आजरा साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. आज शुक्रवारी सकाळी सात वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

थोड्याच वेळात उत्तूर ता. आजरा येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये आघाडीला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. आजच माघारीचा शेवटचा दिवस असल्यामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांची ही तारांबळ उडणार आहे. गेल्या पाच दिवसांपासून या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय आघाडी करण्याचा प्रयत्न हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे हे करत होते. परंतु जागा वाटपानंतर अचानक राष्ट्रवादीने निवडणूकच न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सतेज पाटील, विनय कोरे यांनी एकत्र येत आपली आघाडी जाहीर केली. परंतु कार्यकर्त्यांच्या दबावामुळे अखेर माघारीच्या दिवशी सकाळी आघाडी रिंगणात उतरवण्याचा निर्णय हसन मुश्रीफ यांना घ्यावा लागला  त्यामुळे ही अटीतटीची लढत आता होणार आहे.

Web Title: NCP's decision to contest Azra sugar factory election in kolhapur, hasan mushriff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.