महापालिकेसंदर्भात राष्ट्रवादीची उद्या बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:24 AM2021-03-05T04:24:22+5:302021-03-05T04:24:22+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक केव्हा होणार याबाबत अनिश्चितता असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी ६.३०वाजता ...
कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक केव्हा होणार याबाबत अनिश्चितता असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी ६.३०वाजता शासकीय विश्रामगृहावर होत आहे. या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत.
महापालिकेची निवडणूक नोव्हेंबरपर्यंत पुढे गेली असल्याची चर्चा आहे. राज्य सरकारने कोल्हापूरसह पाच महापालिकांवर नियुक्त केेलेल्या प्रशासकांची मुदत वाढविली असल्याने या चर्चेला आधार मिळाला आहे. त्यामुळे सर्वच पातळीवर शांतता निर्माण झाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उद्या शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीत पक्षाच्या रणनीती चर्चा होणार आहे. मंत्री मुश्रीफ कोल्हापुरात असतात तेंव्हा निवडणुकीच्या आनुषंगाने आढावा घेत असतात असे सांगण्यात आले. बैठकीस कोअर कमिटीत आर. के. पोवार, राजेश लाटकर, आदिल फरास, अजित राऊत, उत्तम कोराणे, संदीप कवाळे, विनायक फाळके, सचिन पाटील, सुनील देसाई, संजय कुराडे यांचा समावेश आहे