राष्ट्रवादीचे मूक आंदोलन

By Admin | Published: January 30, 2015 11:24 PM2015-01-30T23:24:25+5:302015-01-30T23:37:17+5:30

धर्मांध शक्तींचा विरोध : कार्यकर्त्यांचा सहभाग

NCP's silent movement | राष्ट्रवादीचे मूक आंदोलन

राष्ट्रवादीचे मूक आंदोलन

googlenewsNext

कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त आज, शुक्रवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत येथील पापाची तिकटी येथील गांधी पुतळ्याजवळ राष्ट्रवादी पक्षातर्फे तोंडाला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन करण्यात आले. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांध शक्तीला विरोध करण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील, शहराध्यक्ष आणि माजी महापौर आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. काही संघटना महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याच्या विचाराचे उदात्तीकरण करण्यासाठी मोठे कार्यक्रम राबवीत आहेत. त्यांनी गोडसेचे पुतळे, मंदिर उभारण्याची मोहीम सुरू केली आहे. राष्ट्रपिता गांधी यांच्याबद्दल अतिशय क्लेशदायक असे उपक्रम राबविले जात आहेत. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. जगभर महात्मा गांधींचे विचार मार्गदर्शक आहेत. त्यामुळे गोडसेच्या विचारांचे उदात्तीकरण त्वरित थांबवावे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाने केली आहे. विरोध म्हणून आज मूक आंदोलन झाले.
आंदोलनात महापौर तृप्ती माळवी, सभापती आदिल फरास, सुनील देसाई, सलीम मुल्ला, संगीता खाडे, सुनील पाटील, जहिदा मुजावर, इकबाल मुजावर, मधुकर रामाणे, माधुरी नकाते, व्यंकाप्पा भोसले, राजू ढेरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's silent movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.