घुणकी, कुंभोजमधून राष्ट्रवादीची माघार

By Admin | Published: February 14, 2017 12:57 AM2017-02-14T00:57:25+5:302017-02-14T00:57:25+5:30

हातकणंगले तालुका : जिल्हा परिषदेसाठी ५६, पंचायत समितीसाठी १0६ उमेदवार रिंगणात

NCP's withdrawal from Ghunki, Kumbhoj | घुणकी, कुंभोजमधून राष्ट्रवादीची माघार

घुणकी, कुंभोजमधून राष्ट्रवादीची माघार

googlenewsNext


हातकणंगले : तालुक्यातील ११ जिल्हा परिषद जागांसाठी ५६ उमेदवार, तर पंचायत समितीच्या २२ जागांसाठी तब्बल १0६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार या निवडणुकीत नशीब अजमावत आहेत.
तालुक्यातील ११ जिल्हा परिषद आणि २२ पंचायत समिती मतदारसंघात सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. कबनूर जिल्हा परिषदेसाठी भाजप विरुद्ध आवाडे ग्रुपची सर्वपक्षीय आघाडी अशी दुरंगी लक्षवेधी लढत होणार असून, रेंदाळ मतदारसंघात सर्वाधिक १0 उमेदवार असल्याने या ठिकाणी बहुरंगी लढती निश्चित झाल्या आहेत. तर भादोले व शिरोली मध्ये पारंपरिक तिरंगी तर रूकडीमध्ये चौरंगी लढत होणार आहे. अर्ज माघारीच्या सोमवारी शेवटच्या एक तासात नाट्यपूर्ण घडामोडी मध्ये राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिलेले घुणकी आणि कुंभोज या दोन मतदारसंघातील अर्ज मागे घेतल्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी फक्त हुपरी, रेंदाळ आणि पट्टणकोडोलीपुरती शिल्लक राहिली आहे.
पंचायत समितीचे उमेदवार आणि त्यांचा कंसात पक्ष याप्रमाणे नवे पारगाव पंचायत समिती सुलोचना देशमुख (जनसुराज्य), सरोजिनी पाटील (काँग्रेस), रेवती पाटील ( शिवसेना), घुणकी पंचायत समिती सरितादेवी मोहिते (जनसुराज्य), अनिता जाधव (काँग्रेस), शशिकला पाटील( शिवसेना), भादोले पंचायत समिती लक्ष्मण अवघडे (जनसुराज्य), सचिन कांबळे (काँग्रेस), अनिल दबडे ( शिवसेना), काशिनाथ भोपळे ( स्वाभिमानी), टोप पंचायत समिती : प्रदीप पाटील (जनसुराज्य) बाबासो पाटील (काँग्रेस), तानाजी पाटील ( शिवसेना), संजय शिंदे ( राष्ट्रवादी),
लाटवडे पंचायत समिती वसंत गुरव ( जनसुराज्य), ईलाइ देसाई ( शिवसेना), अशोक माळी (स्वाभिमानी), हर्षवर्धन चव्हाण (राष्ट्रवादी), कुंभोज पंचायत समिती : सुजाता कुरणे ( जनसुराज्य), सपना पांडव ( स्वाभिमानी), रेशमा भोसले ( काँग्रेस), कमल सुवासे (शिवसेना),
सावर्डे पंचायत समिती : राजकुमार भोसले (काँग्रेस), अशोक नरंदेकर (जनसुराज्य), शिवाजी भोसले (राष्ट्रवादी), सुनील चव्हाण (शिवसेना).
हातकणंगले पंचायत समिती : विजय निंबाळकर (जनसुराज्य), राम कांबळे (राष्ट्रवादी), चंद्रकांत जाधव (शिवसेना) प्रवीण जनगोंडा ( स्वाभिमानी), नागाव पंचायत समिती : अजित घाटगे ( काँग्रेस), उत्तम सावंत ( भाजप), सुधीर पाटील ( शाहू आघाडी), हेरले पंचायत समिती : सुनीता हराळे (काँग्रेस), नीलोफर मुल्ला (युवक क्रांती आघाडी), महेरनिगा जमादार (स्वाभिमानी), रूकडी पंचायत समिती सत्यजित इंगळे ( युवक क्रांती आघाडी), संतोष किणिंगे ( काँग्रेस), लक्ष्मण मुरुमकर ( शिवसेना), कबीर चव्हाण ( बसप), तारदाळ पंचायत समिती : अंजना शिंदे (भाजप), अस्मिता तांबवे (आवाडे ग्रुप आघाडी), यशोदा जाधव (शिवसेना),
कोरोची पंचायत समिती : जयश्री ओऊळकर (आवाडे ग्रुप आघाडी) संगीता शेट्टी (शिवसेना), पूनम भोसले (भाजप) कबनूर पश्चिम पंचायत समिती सुवर्णा कांबळे ( भाजप), सुजाता नाईक (शिवसेना) महामहानंदा कांबळे (आवाडे ग्रुप आघाडी) कबनूर पूर्व रेश्मा सनदी (भाजप), वहीदा मुजावर (आवाडे ग्रुप आघाडी), शहीदा मुजावर (अपक्ष), रूई पंचायत समिती : जाकीरहुसेन भालदार (युवक क्रांती आघाडी), अजिम मुजावर (आवाडे ग्रुप आघाडी), मुमताज हैदर (कम्युनिस्ट), सिकंदर सुतार (काँग्रेस).
पट्टणकोडोली पंचायत समिती उमेश गुरव (काँग्रेस), अरुण माळी (शिवसेना), अविनाश डावरे (युवक क्रांती आघाडी), प्रकाश नेहरे (स्वाभिमानी)सह इतर अपक्ष, हुपरी उत्तर पंचायत समिती : वैजयंती आंबी( भाजप), ललिता कोळी (शिवसेना), रेवती पाटील (राष्ट्रवादी), साधना बुगटे (स्वाभिमानी), हुपरी दक्षिण पंचायत समिती : किरण कांबळे (आवाडे ग्रुप आघाडी), विद्याधर कांबळे (काँग्रेस), जयकुमार माळगे, भाजप), मानसिंग केगार (शिवसेना)सह इतर अपक्ष चंदूर पंचायत समिती दरगोंडा पाटील( आवाडे ग्रुप आघाडी), रघुनाथ पाटील (भाजप), शिवाजी सादळे (शिवसेना),
रेंदाळ पंचायत समिती : राणी घुणके (शिवसेना), बानुबी मौला (कम्युनिस्ट), शमशाद नदाफ (काँग्रेस), अंजना पाटील (भाजप), संगीता पाटील (आवाडे ग्रुप आघाडी) याप्रमाणे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's withdrawal from Ghunki, Kumbhoj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.