सुमारे ३ हजार जणांनी दिली ‘एमएचसीईटी’ निकाल लागणार १४ जूनला : राज्यातील ५ हजार सातशे दहा जागांसाठी झाली परीक्षा
By admin | Published: May 9, 2014 12:31 AM2014-05-09T00:31:53+5:302014-05-09T00:31:53+5:30
कोल्हापूर : आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २०१४-१५ या वर्षाची सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचसीईटी) आज (गुरुवारी) कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ३ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी दिली.
कोल्हापूर : आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २०१४-१५ या वर्षाची सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचसीईटी) आज (गुरुवारी) कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ३ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी दिली. आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी राज्यातील १२४ महाविद्यालयांतील ५ हजार ७१० उपलब्ध जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी कोल्हापुरातील ३ हजार ८०३ विद्यार्थी-विद्यार्थिनी बसल्या होत्या. जिल्ह्यातील एकूण ९ शाळा व महाविद्यालयांची या परीक्षेसाठी केंद्र म्हणून निवड केली होती. सकाळी नऊ वाजल्यापासून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी आणि पालकांनी गर्दी केली. परीक्षेपूर्वी बैठक व्यवस्था पाहण्यासाठी धावपळ उडाली. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयांची परीक्षा झाली. या परीक्षेत एकूण १८० प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचे प्रत्येकी ४५, तर जीवशास्त्राचे ९० प्रश्न होते. त्याचे स्वरूप अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमांवर आधारित होते. त्यासाठी ७२० गुण होते. त्यातील प्रत्येक प्रश्नासाठी चार गुण होते. गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परीक्षेचा निकाल १४ जूनपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)