अंबाबाईच्या चरणी २० तोळ्यांचा हार अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:39 AM2019-11-23T00:39:57+5:302019-11-23T00:40:17+5:30
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या चरणी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कुटुंबीयांच्या वतीने गिरिजा हत्तीहोळी यांनी साडेवीस तोळ्यांचा तब्बल ...
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या चरणी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कुटुंबीयांच्या वतीने गिरिजा हत्तीहोळी यांनी साडेवीस तोळ्यांचा तब्बल सात लाख ३९ हजार ३५२ रुपये किमतीचा ११ पदरी सोन्याचा हार शुक्रवारी अर्पण केला.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी रीतसर पावती करून या हाराचा स्वीकार केला. नित्यनियमाने शुक्रवारी देवीची आलंकारिक पूजा बांधली होती. त्यात हा सोन्याचा हारही देवीला दिवसभर अन्य सोन्याच्या अलंकारांसोबत परिधान केला होता. यावेळी हत्तीहोळी यांना देवस्थानतर्फे प्रसाद म्हणून साडी देण्यात आली.
यानंतर देवस्थान समितीतर्फे नवरात्रौत्सव उत्साहात पार पडण्यासाठी साहाय्य केल्याबद्दल पोलीस प्रशासन, महालक्ष्मी भक्त मंडळ, व्हाईट आर्मी, आदी संघटना, संस्थांचा
प्रशस्तिपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, एन. डी. जाधव, सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी, मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.