संकेश्वरमध्ये स्मशानभूमी मार्गावर निर्जंतुकीकरणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:24 AM2021-05-10T04:24:19+5:302021-05-10T04:24:19+5:30
संकेश्वर स्मशानभूमी लगतच्या मार्गावर मृत व्यक्तीचे मास्क व हँडग्लोव्हज खुलेआम टाकले जात आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका आणखी वाढला ...
संकेश्वर स्मशानभूमी लगतच्या मार्गावर मृत व्यक्तीचे मास्क व हँडग्लोव्हज खुलेआम टाकले जात आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका आणखी वाढला आहे. कोरोनाबाधितांसाठी वापरलेले साहित्य उघड्यावर न टाकता संबंधित विभागाने त्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांची असून पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
शहरातील नदी गल्लीजवळील हिंदू स्मशानभूमीत कोरोनाने मृत होणाऱ्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अंत्यसंस्कारासाठी मृत व्यक्तींच्या काही नातेवाइकांना खबरदारी म्हणून पीपीई कीट, हँडग्लोव्हज व मास्क साहित्य देण्यात येते. मात्र, मृतांवर अंत्यसंस्कार करून झाल्यानंतर संबंधित नातेवाइकांकडून पीपीई कीट, हँडग्लोव्हज व मास्क स्मशानभूमी मार्गावर उघड्यावर टाकले जात आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. उघड्यावर टाकण्यात आलेल्या कीटची पालिकेने त्वरित विल्हेवाट लावून परिसराचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे बनले आहे.
---------------------------------
फोटो ओळी : संकेश्वर येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर कोरोनाबाधितांसाठी वापरलेले पीपीई कीट व मास्क असे उघड्यावर फेकण्यात आले आहेत.
क्रमांक : ०९०५२०२१-गड-१०