विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाची आवड वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:50 AM2020-12-11T04:50:03+5:302020-12-11T04:50:03+5:30

येथील नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये ‘तंत्रज्ञान आधारित शिक्षण पद्धती’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आर. ए. ...

The need to increase interest in technology among students | विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाची आवड वाढविण्याची गरज

विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाची आवड वाढविण्याची गरज

googlenewsNext

येथील नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये ‘तंत्रज्ञान आधारित शिक्षण पद्धती’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आर. ए. पाटणकर प्रमुख उपस्थित होते. युवकांनी तंत्रज्ञानातील कल्पकता दाखविली पाहिजे. ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर केला तरीही भविष्यात शिक्षकांची गरज ही कायम राहणार असल्याचे अजय नरके यांनी सांगितले. पारंपरिक शिक्षण पद्धती बदलून नवीन तंत्रज्ञानाचा वापर अध्ययन-अध्यापनामध्ये होणे काळाची गरज असल्याचे आर. ए. पाटणकर यांनी सांगितले. त्यांनी शिक्षकांसाठी आदर्श टेक्नॉलॉजी शिक्षक पुरस्कार जाहीर केला.

या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त एन. एल. ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सिद्धार्थ पाटणकर आदींसह पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मुख्याध्यापक एस. आर. गुरव यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. एच. आर. सत्रे यांनी सूत्रसंचालन केले. पी. जे. बामणे यांनी आभार मानले.

चौकट

आवडीचे शिक्षण द्यावे

वाचनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे. त्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण दिले, तर ते आवडीने शिकतील, असे मत सिद्धार्थ पाटणकर यांनी सांगितले.

फोटो (१०१२२०२०-कोल-नागोजीराव पाटणकर न्यूज फोटो) : कोल्हापुरातील नागोजीराव पाटणकर हायस्कूलमधील कार्यशाळेत सॉफ्टवेअर इंजिनिअर अजय नरके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून एन. एल. ठाकूर, आर. ए. पाटणकर, सिद्धार्थ पाटणकर उपस्थित होते.

Web Title: The need to increase interest in technology among students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.