सुसंस्कारीत पिढी घडविण्यासाठी वाचनालयांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:49 AM2020-12-05T04:49:51+5:302020-12-05T04:49:51+5:30
थेरगाव (ता. शाहूवाडी) येथे राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ...
थेरगाव (ता. शाहूवाडी) येथे राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख हे होते .
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत रेडेकर यांनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख म्हणाले, कोणतेही शासन अनुदान नसताना राजर्षी शाहू वाचनालयाचे सुरू असलेले काम कौतुकास्पद आहे. अशा वाचनालयांचे महत्त्व ओळखून सर्वांनीच वाचनालयाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे . यावेळी प्रकाश पाटील, बाजीराव रेडेकर, बी. बी. पाटील, राजाराम खामकर, गणपती रेडेकर, राहुल पाटील, डॉ. विनायक पाटील, डी. पी. शिंदे, जालिंदर रेडेकर, तानाजी चौगुले, लक्ष्मण खोपडे, विजय पाटील, रामराव यादव, रवी पाटील, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश नाईक यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुभाष सुतार यांनी केले.