नवसमाजनिर्मितीसाठी वाचन संस्कृतीची जोपासना आवश्यक : चंद्रकांतदादा पाटील
By admin | Published: June 4, 2017 08:18 PM2017-06-04T20:18:57+5:302017-06-04T20:18:57+5:30
चिकोडे वाचनालयाच्या ‘पुस्तकांची वारी - तुमच्या दारी’ उपक्रमाचा प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिक्षित व सुसंस्कृत नवसमाजनिर्मिर्तीसाठी वाचनसंस्कृतीची जोपासना महत्त्वाची आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी (दि. ३) येथे व्यक्त केले. जरगनगर येथील कै. भालचंद्र चिकोडे वाचनालयातर्फे सुरू केलेल्या ‘पुस्तकांची वारी - तुमच्या दारी’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे, निर्मिर्ती अॅडव्हर्टायझिंगचे अनंत खासबारदार, शिरीष खांडेकर, अॅड. शिवप्रसाद पाटील, दिलीप बापट, उद्योगपती नरेश चंदवाणी, प्रवीण पाटील, नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर, दीपक शिरगावकर, आदी प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, समाजात वाचनसंस्कृती जोपासण्याच्या उद्देशाने चिकोडे वाचनालयाच्या वतीने हाती घेतलेल्या ‘पुस्तकांची वारी - तुमच्या दारी’ या उपक्रमाद्वारे समाजाला नवी दिशा मिळेल. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे समाजात वाचनसंस्कृती वाढीस लागेल, लहान मुलांना आपल्या घर व परिसरात पुस्तके उपलब्ध होतील, त्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल. राहुल चिकोडे यांनी स्वागत केले.
यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, वाचक व विद्यार्र्थी उपस्थित होते. कोल्हापुरातील जरगनगर येथील कै. भालचंद्र चिकोडे वाचनालयातर्फे सुरू केलेल्या ‘पुस्तकांची वारी - तुमच्या दारी’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ रविवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राहुल चिकोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.