सुसंस्कृत व सशक्त समाज निर्मितीसाठी वाचनाची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:29 AM2021-02-25T04:29:35+5:302021-02-25T04:29:35+5:30
आजऱ्यातील नालंदा वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य शिवाजी कांबळे होते. मान्यवरांच्याहस्ते गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. ...
आजऱ्यातील नालंदा वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य शिवाजी कांबळे होते.
मान्यवरांच्याहस्ते गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मोबाईलच्या युगात पुस्तकांशी मैत्री दुर्मीळ होत चालल्याची खंत व्यक्त करून, तरुणांनी वाचनाकडे वळावे, असे आवाहन अध्यक्षीय मनोगतात शिवाजी कांबळे (व्हन्याळी) यांनी केले.
आजऱ्यात सुसज्ज सांस्कृतिक हॉल बांधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नगरसेवक किरण कांबळे यांनी सांगितले.
यावेळी कारखाना माजी संचालक एस. पी. कांबळे, महेश देशमुख, विजय कांबळे, जीवन शेवाळे, गौतम मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास गणपती राजदीप सुनिल कांबळे, शिवाजी सम्राट, सुप्रिया कांबळे, बी. के. कांबळे, शांताराम हरेर, विश्वास कांबळे, विष्णू मेंढोलीकर, डॉ. उल्हास त्रिरत्ने, प्रतिभा कांबळे, निलांबरी कांबळे, प्रिती कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सुनिल कांबळे यांनी सूत्रसंचलन केले. शिवाजी सम्राट यांनी आभार मानले.