सामाजिक विकासाला चालना देणारे संशोधन हवे : डॉ. शिवराम भोजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 10:39 AM2019-02-27T10:39:36+5:302019-02-27T10:40:42+5:30
संशोधन हे केवळ प्रकाशनासाठी किंवा पदवी प्राप्त करण्यासाठी नसावे, तर ते व्यापक व समाजहितासाठी असावे, सामाजिक विकासाला चालना देणारे असावे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांनी दिले. सायबर महाविद्यालयात आयसीएसएसआर मुंबई पुरस्कृत संशोधनातील गुणवत्ता या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापूर : संशोधन हे केवळ प्रकाशनासाठी किंवा पदवी प्राप्त करण्यासाठी नसावे, तर ते व्यापक व समाजहितासाठी असावे, सामाजिक विकासाला चालना देणारे असावे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांनी दिले. सायबर महाविद्यालयात आयसीएसएसआर मुंबई पुरस्कृत संशोधनातील गुणवत्ता या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. भोजे म्हणाले, तंत्रज्ञानातील गुणवत्तापूर्वक संशोधनामुळे काही क्षेत्रांमध्ये आपल्या देशाला जागतिक पातळीवर नावलौकिक कमविता आला असून, अशा प्रकारच्या कार्यशाळेमधून नवीन संशोधकांना दिशा मिळू शकेल, असा आशावाद व्यक्त करून संशोधनात गुणवत्ता असलीच पाहिजे.
टाटा इन्स्टिट्युट आॅफ सोशल सायन्सेस मुंबई येथील डॉ. बाल मुर्गन, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. अरविंद गुलबाके यांनी मार्गदर्शन केले.
चर्चासत्राचे समन्वयक डॉ. बाबू झकेरिया यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सी. एस. काळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. विश्वस्त डॉ. व्ही. एम. हिलगे यांनी सायबर संस्थेचा आढावा घेतला. ‘नॅक’चे समन्वयक डॉ. टी. व्ही. जी. सर्मा यांनी आभार मानले.
कार्यशाळेत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व आंध्रप्रदेश येथील सुमारे ५२ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यावेळी कार्यशाळेत संचालक डॉ. एम. एम. अली, प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी, डॉ. आर. व्ही. कुलकर्णी, कार्यशाळेचे समन्वयक प्रा. ए. डी. इकल, डॉ. दीपक भोसले, प्रशासकीय अधिकारी विनायक साळोखे, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.