कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकीची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:58+5:302021-05-29T04:18:58+5:30
कोपार्डे : कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज आहे. या काळात जेवढे होईल तेवढे कोरोनाबाधितांना व नातेवाइकांना ...
कोपार्डे : कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज आहे. या काळात जेवढे होईल तेवढे कोरोनाबाधितांना व नातेवाइकांना मदत करण्याची गरज असल्याचे मत डॉ. के. एन. पाटील यांनी व्यक्त केले. भगवानराव पाटील ट्रस्टच्या वतीने डॉ. पाटील यांच्या हस्ते शिंगणापूर व कुंभी-कासारी कोविड सेंटरला औषधपुरवठा करण्यात आला. यावेळी कुडित्रेचे सरपंच जोत्स्ना युवराज पाटील, वाकरे सरपंच वसंत तोडकर, शिंगणापूरचे सरपंच प्रकाश रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, करवीर राष्ट्रवादी अध्यक्ष शिवाजी देसाई, सरदार पाटील, युवराज पाटील, धीरज पाटील (कुडित्रे), एस. के. पाटील उपस्थित होते.
२८ के एन पाटील
कुंभी कासारी कोविड सेंटरला पाडळी खुर्द येथील भगवानराव पाटील ट्रस्टच्या वतीने औषध पुरवठा करताना डॉ. के. एन. पाटील. यावेळी जि. प. सदस्य सुभाष सातपुते उपस्थित होते.