शिबिराबरोबर समस्याही सोडविण्याची गरज
By Admin | Published: January 8, 2015 10:06 PM2015-01-08T22:06:11+5:302015-01-09T00:02:51+5:30
उल्हास पाटील : मगदूम अभियांत्रिकी, आयुर्वेदिक कॉलेजच्या श्रमसंस्कार शिबिराची सांगता
जयसिंगपूर : शिबिरार्थी विद्यार्थ्यांना समाजातील ग्रामीण भागातील लोकांच्या हिताबद्दल तळमळ असली पाहिजे. जनतेच्या समस्या जाणून घेऊनही त्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ग्रामीण भागातील लोकांत आरोग्य, स्वच्छता याविषयी जनजागृती करण्यासाठी शिबिर अत्यंत उपयोगी आहे, असे प्रतिपादन आमदार उल्हास पाटील यांनी केले.
येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग व आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेंर्तगत चिंचवाड (ता. शिरोळ) येथील श्रमसंस्कार शिबिराची सांगता करण्यात आली. यावेळी आमदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. के. गुप्ता होते. यावेळी उद्योगपती अरुण घाटगे, पुष्पाताई चौगुले उपस्थित होते.
यावेळी डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी चिंचवाड येथे ड्रेनेज लाईन सर्व्हे, पाणी परीक्षण, स्वच्छता, आरोग्याबद्दलची जनजागृती, तसेच ४७० रुग्णांची आरोग्य तपासणी करून उपचार करून चांगले कार्य केले आहे. शिबिरामधून उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून पुष्पजित शिंदे, रणजित शिंदे, गणेश खरात, संकेत खोत, अमित आपटे, निखिल पाटील, नेहा सकळे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रा. ए. बी. यादव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. वैजनाथ यादव यांनी मेडिकल शिबिराची माहिती दिली. ओकांर व्हरकट, अरुंधती जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रबंधक ए. बी. घोलप, प्रा. आर. एस. पवार, प्रा. डी. बी. देसाई, डॉ. ए. एस. यादव, डी. आर. माने, विजय गोधडे, प्रमोद चौगुले, प्रशांत पाटील, सुदर्शन ठोमके, रंजना घाटगे उपस्थित होते. प्रा. एम. बी. तांदळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)