संकटांचा एकत्रित मुकाबला करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:23 AM2021-02-13T04:23:38+5:302021-02-13T04:23:38+5:30
कसबा तारळे : शहरांप्रमाणेच ग्रामीण भागात वाढत चाललेली मॉल संस्कृती, जीएसटी, वजन-काटा पासिंगच्या नावाखाली होणारी लूट, अन्न व भेसळ ...
कसबा तारळे : शहरांप्रमाणेच ग्रामीण भागात वाढत चाललेली मॉल संस्कृती, जीएसटी, वजन-काटा पासिंगच्या नावाखाली होणारी लूट, अन्न व भेसळ विभागाचा मनमानी कारभार यासह एकापाठोपाठ येणाऱ्या संकटांनी हतबल झालेल्या व्यापाऱ्यांनी या संकटांचा संघटित मुकाबला करण्याची गरज आहे, असे मत राधानगरी तालुका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष एकनाथ चौगले यांनी व्यक्त केले.
कसबा तारळे येथील व्यापारी असोसिएशनचे नामफलक उद्घाटन व व्यापारी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कसबा तारळे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आनंदराव शिवुडकर होते.
यावेळी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अनिल बडदारे, सिद्राम कोथमिरे, जिल्हा केमिस्ट सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई, शशिकांत तेली, निवास आंबेकर, विजय मोहिते, सतीश फणसे, अशोक पाटील, अशोक देवकर, मिलिंद आंबेकर, शिवाजी तेली उपस्थित होते.
फोटो : १२ कसबा तारळे
कसबा तारळे येथील व्यापारी असोसिएशनच्या मेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्ज्वलनाने करताना एकनाथ चौगले, शेजारी सतीश फणसे, दीपक तेली, सचिन जठार, आनंदा शिवुडकर, शशिकांत तेली आदी.