वृक्षसंगोपन काळाची गरज : सदाशिव खाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:55+5:302021-07-02T04:16:55+5:30
सांगरूळ : बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाची खूप मोठी हानी झाली आहे. यामुळे निसर्गचक्र बदलले असून वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी आहे. ...
सांगरूळ : बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाची खूप मोठी हानी झाली आहे. यामुळे निसर्गचक्र बदलले असून वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी आहे. नैसर्गिक ऑक्सिजन टिकवण्यासाठी वृक्षसंगोपन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सांगरूळचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव खाडे यांनी केले.
सांगरूळ येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयाच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील रिकाम्या जागेतील झुडपे, तण, काढून या परिसराची स्वच्छता करून याठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सदाशिव खाडे होते.
या वेळी राजयोगिनी सुनीता दीदीजी म्हणाल्या, प्राचीन काळापासून झाडाचं आणि माणसाचं विशिष्ट नात आहे. माणसाच्या जन्मापासून अखेरच्या क्षणापर्यंत झाडांचा उपयोग होत असतो. यामुळे प्रत्येक माणसाने किमान एक झाड लावून ते जगवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
या वेळी पं. स. सदस्या अर्चना खाडे, उपसरपंच सुशांत नाळे, रश्मी दीदीजी, विष्णू भाई, एकनाथ भाई संभाजी भाई, सचिन नाळे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिक्षक एस. बी. घुनकीकर, सर्जेराव यादव, सागर नाळे, रघुनाथ भाई, बी. के. भारती यांच्यासह प्रजापिता ब्रह्माकुमारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळी - सांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात प्रजापिता ब्रह्माकुमारी यांच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी सरपंच सदाशिव खाडे, पं. स. सदस्या अर्चना खाडे, उपसरपंच सुशांत नाळे आदी.