बालकांना समजून घेण्याची गरज

By admin | Published: November 17, 2014 12:12 AM2014-11-17T00:12:50+5:302014-11-17T00:25:59+5:30

बालदिनी चर्चासत्र : मुलांना धाकदपटशाहीने नव्हे, विश्वासाने समजवा : काळे

The Need to Understand Children | बालकांना समजून घेण्याची गरज

बालकांना समजून घेण्याची गरज

Next

कोल्हापूर : केवळ छडी आणि धाकदपटशाहीने मुले ऐकत नाहीत; तर त्यांचा विश्वास संपादन करून, चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव केवळ त्यांच्या मनात शिरूनच करून देता येते, असे प्रतिपादन निवृत्त शिक्षिका माधवी काळे यांनी केले. दलितमित्र बापूसाहेब पाटील गं्रथालय व निसर्गमित्र यांच्यातर्फे आयोजित ‘बालपणीतील शिक्षक’ याविषयी चर्चासत्रात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुरेश शिपूरकर होते.
काळे म्हणाल्या, पालकांनी भौतिक सुखांच्या मागे न लागता शरीर ही संपत्ती आहे, असे समजून समाजात मिसळावे. त्याचबरोबर मुले ही उद्याचा भविष्यकाळ असल्याने त्यांच्याबरोबर मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन करावा. शाळेत अथवा बाहेर काही घटना घडल्यास मुले ती तत्काळ जवळच्या व्यक्तीला सांगतात. त्यामुळे धाकदपटशाहीपेक्षा त्यांना मायेने सांगितल्यास त्यांच्यावर सुपरिणाम होतो. घरातील कामांची विभागणी केल्यास थोडे कष्ट पडतात; पण शरीराला त्याची सवय होते. त्यामुळे चाळिशीनंतर औषधे घ्यावी लागत नाहीत. त्यामुळे चांगली प्रकृती हीच खरी संपत्ती आहे.
अनिल चौगले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका शुभदा घाटगे, संतोष मंडलिक, प्रकाश पुणेकर, संजय चिदगे, दीपक पाटील, किशोर धामणस्कर, लता गुळवणी, गीता गुळवणी, मीनाक्षी आवटे, सुनंदा धामणस्कर, मनीषा जानकर, दीपा आडुरकर, संगीता धामणस्कर, शिवाजी गवळी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


आठवणींना उजाळा
१९८५, १९८६ आणि १९८७ सालांमध्ये शाहू दयानंद हायस्कूल येथून दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या विद्यार्थ्यांनी तत्कालीन आठवणींना उजाळा दिला. यात पहिल्या बाकावर बसणारे, बार्इंचा ओरडा खाणारे आणि व्याकरणात चुका करणारे अशा सर्वांनी त्यावेळच्या आठवणी उपस्थितांना सांगितल्या.

Web Title: The Need to Understand Children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.