राजकारणासह सर्व क्षेत्रात यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 02:36 PM2019-11-26T14:36:47+5:302019-11-26T14:37:18+5:30
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले, यशवंतराव चव्हाण साहेबांचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संरक्षण आणि साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. एखाद्या सामान्य माणसाने त्यांना हात केला तरी ते थांबून त्याच्या अडीअडचणी जाणून घ्यायचे आणि त्या प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करायचे. त्यांच्या विचारांची आज सर्वच क्षेत्रात नितांत गरज आहे.
कोल्हापूर : राजकारणासह सर्वच क्षेत्रातील आजच्या अस्वस्थतेच्या काळात यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची खूप मोठी गरज आहे. ज्यांना राजकारणात दीर्घकालीन यश मिळवायचे आहे, त्यांनी यशवंतरावांच्या विचारांचे बोट धरून चालावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी केले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागात सोमवारी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचे व्याख्यान झाले. प्रारंभी प्रतिमा पूजन तसेच श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले, यशवंतराव चव्हाण साहेबांचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संरक्षण आणि साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. एखाद्या सामान्य माणसाने त्यांना हात केला तरी ते थांबून त्याच्या अडीअडचणी जाणून घ्यायचे आणि त्या प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करायचे. त्यांच्या विचारांची आज सर्वच क्षेत्रात नितांत गरज आहे.
प्रा. डॉ. विजय देठे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. राहुल मांडणीकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. दीपककुमार वळवी, प्रा. अरुण कांबळे, प्रा. डॉ. धनंजय काशीद-पाटील, ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील, राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागात यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण. यावेळी प्रा. विजय देठे, प्रा. डॉ. राहुल मांडणीकर, आदी उपस्थित होते.