लोकशाहीच्या बळकटीसाठी तरुणांच्या पुढाकाराची गरज
By admin | Published: July 27, 2014 12:45 AM2014-07-27T00:45:04+5:302014-07-27T01:13:44+5:30
मोनिका सिंग : मुरगूडमध्ये मतदार जागृती अभियान
मुरगूड : जगात लोकशाही पद्धतीने शासन स्थापन करण्याची भारतातील पद्धत उल्लेखनीय आहे; पण खऱ्या अर्थाने या लोकशाहीला बळकटी आणावयाची असेल तर तरुणांनी मतदान करणे, नोंदणी, तसेच निवडणूक लढविण्यासाठीसुद्धा पुढे आले पाहिजे, असे आवाहन कागल-राधानगरीच्या प्रांताधिकारी मोनिका सिंग यांनी केले.
मुरगूड (ता. कागल) येथे मंडलिक महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियानाच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अर्जुन कुं भार होते. यावेळी मंडल अधिकारी सुंदर जाधव, तलाठी जे. सी. चंदनशिवे उपस्थित होते.
मोनिका सिंग म्हणाल्या, तरुणांचा निवडणूक कार्यक्रमातील अत्यल्प सहभाग हा चिंतनीय विषय आहे. शासनाला बळकटी आणण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
यावेळी मुख्याधिकारी बी. एस. जगताप, प्राचार्य कुंभार यांची भाषणे झाली. प्रा. टी. एम. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. पांडुरंग सारंग, प्रा. शिवाजीराव होडगे, आदी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. तलाठी जे. एम. चंदनशिवे यांनी आभार मानले. (वार्ताहर)