फिरस्त्यांसह गरजूंनी दिला तृप्तीचा ढेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:35 AM2021-02-23T04:35:38+5:302021-02-23T04:35:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : अन्नाचा एक घास मिळावा म्हणून व्याकुळ नजरेने पाहणाऱ्या फिरस्त्यांकरिता रविवारचा दिवस सणासारखाच उगविला. अशा ...

The needy gave a sigh of relief along with the pilgrims | फिरस्त्यांसह गरजूंनी दिला तृप्तीचा ढेकर

फिरस्त्यांसह गरजूंनी दिला तृप्तीचा ढेकर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : अन्नाचा एक घास मिळावा म्हणून व्याकुळ नजरेने पाहणाऱ्या फिरस्त्यांकरिता रविवारचा दिवस सणासारखाच उगविला. अशा फिरस्त्यांसह गरजूंना गरमागरम चपात्या, भात, आमटी, गुलाबजाम, लाडू, जिलेबी, खाजा, केळी, सफरचंद असे सुग्रास जेवण मिळाल्याने त्यांनी तृप्तीचा ढेकर दिला.

फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो, याच प्रेमाच्या महिन्यात कोल्हापूर युथ मुव्हमेंटसच्या माध्यमातून एक घास भुकेल्यांच्यासाठी म्हणून रोटी डे हा उपक्रम फेब्रुवारी महिन्यातील तिसऱ्या रविवारी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सोशल मीडियाद्वारे संस्थेच्यावतीने भाजी, चपाती, भात, भाकरी यापैकी शिजवलेले अन्न बिंदू चौकात आणून देण्याचे आवाहन केले होते. त्यास कोल्हापूरकरांनी सलग तिसऱ्या वर्षी उदंड प्रतिसाद दिला. दिवसभरात तांदूळ (७०० किलो), गहू (१५० किलो), साखर (२० किलो), फरसाणा (३ किलो), केळी (५ डझन), बिस्किटे (१५ बाॅक्स) यासह इतर अन्नधान्य वस्तू स्वरूपात मदत दिली. जमा झालेले अन्न सीपीआर, महालक्ष्मी मंदिर, महाद्वार रोड, बाबूजमाल दर्गा, रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बस स्थानक आदी परिसरातील भुकेल्यांना देण्यात आले. धान्य स्वरूपात आलेली मदत येत्या काही दिवसांत कुष्ठरोग धाम, अंध शाळा, एड्‌सग्रस्त मुलांची शाळा, अनाथाश्रम, डोंगराळ भागातील वाड्या-वस्त्या अशा ठिकाणी दिली जाणार आहे. यावेळी मुव्हमेंटच्या अध्यक्षा शीतल पंदारे, उपाध्यक्षा वसुधा निंबाळकर, सचिव ज्योती चौगुले, नीलम माळी, निलांबरी जांभळे, प्राजक्ता प्रधान, गीतांजली डोंबे, खजानिस स्नेहल शिर्के, प्रणव कांबळे, अक्षय चौगुले, नीलेश बनसोडे, समीर जमादार, शिवराम बुध्याळकर, साईनाथ तुरटवाड आदी उपस्थित होते.

२१०२२०२१-कोल-रोटी डे

आेळी : कोल्हापूर युथ मुव्हमेंटसतर्फे रविवारी बिंदू चौकात आयोजित केलेल्या रोटी डे उपक्रमास भरघोस प्रतिसाद लाभला. कोल्हापुरातील महिलादात्यांनी घरून शिजवून आणलेले अन्न संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.

(छाया : नसीर अत्तार)

Web Title: The needy gave a sigh of relief along with the pilgrims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.