बेकायदेशीर माती उत्खननाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Published: May 13, 2017 12:32 AM2017-05-13T00:32:28+5:302017-05-13T00:32:28+5:30

बेकायदेशीर माती उत्खननाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Neglecting the administration of illegal soil excavation | बेकायदेशीर माती उत्खननाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

बेकायदेशीर माती उत्खननाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Next


संतोष बामणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उदगांव : शिरोळ तालुक्यातील उदगांव, चिंचवाड परिसरातील वीटभट्टीबाबत शरद चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनंतर लोकायुक्त यांच्या अहवालात ३३ हजार ४८७ ब्रास मातीचे बेकायदेशीर उत्खनन झाले असल्याचे समोर आले आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर माती उत्खनन होत असताना स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कारवाई का केली नाही? तसेच होत असलेले उत्खनन कसे निदर्शनास आले नाही? असा सवाल येथील नागरिकांतून उपस्थित होत आहे.
बेकायदेशीर माती उत्खननप्रश्नी तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडून मुंबई राज्य लोकायुक्त याबाबतचा अहवाल दिला होता. यावेळी ३३ हजार ४८७ ब्रास माती बेकायदेशीरपणे उत्खनन केल्याचे समोर आले आहे. तसेच लोकायुक्त यांनी माती उत्खनन केलेल्या ठिकाणी पंचनामा करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उदगांव, चिंचवाड परिसरातील वीटभट्टी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
माती उत्खनन करण्यासाठी पर्यावरण मंडळ, एमएसईबी, पाटबंधारे विभाग, गावसभा, प्रदूषण मंडळ यांच्या परवानगी कुठे गेली त्यांनीही आजपर्यंत यावर कोणती भूमिका घेतली आहे ते दाखवावे, असा सवाल नागरिकांतून होत आहे.
हे प्रकरण कोल्हापूर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, इचलकरंजी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनाही माहीत असल्याने स्थानिक प्रशासनावर कोणता अंकुश लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Neglecting the administration of illegal soil excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.