नेजचा पाझर तलाव झुडपाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:50 PM2019-05-19T23:50:45+5:302019-05-19T23:50:50+5:30

भरत शास्त्री । लोकमत न्यूज नेटवर्क बाहुबली : हातकणंगले तालुक्यातील नेज गावच्या पाझर तलावाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. ...

Nej's percolation lake | नेजचा पाझर तलाव झुडपाआड

नेजचा पाझर तलाव झुडपाआड

Next

भरत शास्त्री ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बाहुबली : हातकणंगले तालुक्यातील नेज गावच्या पाझर तलावाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. सध्या तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे शिवाय तलावाच्या बंधाऱ्याजवळ झाड-झुडपांमुळे बांधाच्या मजबुतीला तडा जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नेजचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
हा तलाव चार दशकांपूर्वी गावच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सन १९७२ मध्ये तयार करण्यात आला होता. नेज व आळते गावांच्या सीमेवर आळते गावाच्या हद्दीत या पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली होती. सदर जमिनीचे अधिग्रहण सन १९७८ मध्येच पूर्ण झाले होते तेव्हाच त्याचे कामही पूर्ण करण्यात आले होते; परंतु अनेक वर्षे सुस्त शासकीय यंत्रणेमुळे सदर जमीन संपादनानंतर ही मालकी हक्क लावून घेण्याचे काम प्रशासनाने केले नाही.
त्यामुळे अनेक शेतकºयांनी या गोष्टींचा गैरफायदा घेऊन तलावाच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केले. अनेक एकर जमीन शेतकरी अवैध पद्धतीने कसत आहेत. हा सर्व प्रकार गेली अनेक वर्षे असाच सुरू आहे; पण तालुका व जिल्हा प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. ज्या हेतूने चार दशकांपूर्वी दूरदृष्टीने तलाव तयार केला होता. त्याच्या मुख्य हेतूलाच हरताळ बसत आहे.
हा तलाव ३३ एकर २१ गुंठ्यांमध्ये पसरलेला आहे. एवढा भव्य तलाव असल्याने याची चांगली डागडुजी व सतत नीगा राखल्यास ४०० ते ५०० एकर जमिनीवरील शेतीला याचा फायदा होईलच. शिवाय भागातील विहिरी व बोअरिंगच्या पाणीपातळीत वाढ होण्यास देखील मदत होईल. सध्या तलावाला डागडुजीची गरज आहे कारण जसे पावसात त्यामध्ये थोडे फार पाणी साठते ते पाणी बंधारा मजबूत नसल्याने गळून जाते.
दरम्यान, तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास तलावाच्या प्रभाव क्षेत्रामध्ये येणाºया विहिरींना वर्षभर पाणी उपलब्ध होऊन वर्षभर विविध प्रकारची पिके नेज-शिवपुरीच्या शेतकºयांना घेता येणार आहेत. तलावामधील अतिक्रमण व दुर्लक्षामुळे तलावाची उपयोगिता कमी झाली आहे. त्याचा फटका मात्र शेतकºयांना बसत आहे.
गेल्यावर्षीपासून नेज ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु म्हणावे तेवढे यश त्यांच्या हाती लागले नाही. येणाºया पावसाच्या आधी तलावाचे काम पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने त्याचा वापर होणे आवश्यक आहे. यासाठी तालुका, जिल्हा प्रशासन व नेज ग्रामपंचायत अधिक प्रयत्न करतील, हीच अपेक्षा.

Web Title: Nej's percolation lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.