नेसरी विभाग मराठा समाजाचा संभाजीराजेंच्या भूमिकेला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:27+5:302021-06-16T04:32:27+5:30
१६ जूनला होणाऱ्या मूक आंदोलनात राजेंच्या पुढील आदेशावरून सहभागी होणार असल्याचे ठरविण्यात आले. यावेळी अॅड. संदीप फगरे म्हणाले, मराठा ...
१६ जूनला होणाऱ्या मूक आंदोलनात राजेंच्या पुढील आदेशावरून सहभागी होणार असल्याचे ठरविण्यात आले.
यावेळी अॅड. संदीप फगरे म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. मराठा तरुण चांगले शिक्षण घेऊनही बेकारीच्या खाईत फेकले गेले आहेत. मराठा समाजाची वाताहत झाली आहे. आता योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे सांगितले.
सरोळीचे कार्यकर्ते रवळू पाटील म्हणाले, मराठा समाजाला डावलण्याचे काम सध्या होत असून, भविष्यात राजकारणी लोकांवर अवलंबून न राहता आपल्या न्याय हक्कासाठी हा लढा अधिक तीव्र झाला पाहिजे, जेणेकरून मराठा समाजाच्या पुढील पिढीला याचा निश्चित फायदा होईल.
यावेळी शिवाजीराव हिडदुगी, कार्तिक कोलेकर, प्रकाश मुरकुटे यांच्यासह भरमू जाधव (तावरेवाडी), अजित देसाई (कानडेवाडी), अमर सासूलकर (सावतवाडी तर्फ नेसरी), आदी उपस्थित होते. एस. एन. देसाई यांनी आभार मानले.