नेसरीच्या अमित पाटीलची खुल्या गटात बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:57 AM2018-02-19T00:57:47+5:302018-02-19T00:57:52+5:30

Nessi's Amit Patil is in the open category | नेसरीच्या अमित पाटीलची खुल्या गटात बाजी

नेसरीच्या अमित पाटीलची खुल्या गटात बाजी

Next


कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या जोरावर रविवारी ‘लोकमत ’ ने पोलिस ग्राउंड येथे आयोजित केलेल्या ‘महामॅरेथॉन’ मध्ये २१ कि.मी पुरुष खुल्या गटात नेसरीचाअमित पाटील, तर प्रौढांमध्ये पांडूरंग पाटील अव्वल स्थान पटकावित प्रथम क्रमांक पटकाविला.
२१ कि.मी (खुला गट) पुरुष (विजेत्यांची नावे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय अशी) : अमित पाटील (नेसरी), तुकाराम मोरे (डब्ल्यूआरएस क्लब, कोल्हापूर), विष्णू आटोळे (सिद्धखेडराजा). २१ कि.मी (प्रौढ) पुरुष : पांडूरंग पाटील, विश्वास चौगुले, उदय महाजन (सर्व कोल्हापूर)
२१. कि.मी डिफेन्स गट (पुरुष) : दीपक कुंभार(१०९ मराठा,टी.ए.बटालियन), अनंथा टि.एन(सैन्य दल, पुणे), अनिल जाधव(सैन्यदल,पुणे ).
१० कि.मी (खुला) : पुरुष : राजाराम खौंदळ (शाहूवाडी), प्रतिक बंडगर(तात्यासाहेब कोरे मिलिटरी अ‍ॅकॅडमी, वारणानगर), युवराज बनसोडे (कोल्हापूर).
१०.कि.मी (खुला) : महिला : सोनाली देसाई(कोल्हापूर), पुजा श्रीडोळे (लातूर), प्रतिक्षा पाटील (गडहिंग्लज).१०.कि.मी (प्रौढ) पुरुष : भगवान कच्छवे (औरंगाबाद), आबासाो इंदुलकर (उचगाव, कोल्हापूर),
१० कि.मी. (प्रौढ) महिला : अनुराधा कच्छवे, माधुरी निमजे (औरंगाबाद), पल्लवी मूग (कोल्हापूर).

रात्रभरचा प्रवास
अन्... फिनिशिंग...
आपल्या मुलांचे करिअर अ‍ॅथेलेटिक्समध्ये करिअर घडविण्याच्या उद्देशाने ‘राजुरी स्टील’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोलापूरहून गुडूक कुटुंबीय सहभागी झाले होते. पाच व सहा वर्षाच्या साई व श्रद्धा यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे कुटुंबीय रात्रभर प्रवास करून पहाटे ते कोल्हापुरात दाखल झाले होते. स्पर्धेतील तीन किलोमीटर स्पर्धेत सहभाग नोंदवत स्पर्धेतील अंतिम टप्पा पार केल्यानंतर या कुटुंबीयाचा आनंद गगनाला मावत नव्हता.
केशव हे खासगी कंपनी नोकरी करतात. तर वैशाली या गृहीणी आहेत. त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्याही या रनमध्ये सहभागी झाल्या होत्या. आपल्या दोन्ही मुलांना अ‍ॅथलेटिक बनवायचे आहे या उद्देशाने ते सहभागी झाले होते. या दोन्ही मुलांनी नॉनस्टॉप तीन किलोमीटर टप्पा पार केला. दोन्ही मुलांनी केलेल्या कामगिरीमुळे आई- वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. तर या स्पर्धेत सहभागी झाल्याने मुलांच्या आत्मविश्वास वाढला आहे. तसेच माझ्या पत्नीचे हृदयाची शस्त्रक्रिया होऊनसुद्धा फक्त मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी ती या स्पर्धेत धावल्याने मला खूप आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी केशव यांनी व्यक्त केली.

Web Title: Nessi's Amit Patil is in the open category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.