रामतीर्थ शिक्षक पतसंस्थेला ३६ लाख २१ हजारांचा निव्वळ नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:28 AM2021-04-30T04:28:41+5:302021-04-30T04:28:41+5:30
आजरा येथील रामतीर्थ प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात ३६ लाख २१ हजार १८६ रुपयांचा निव्वळ नफा ...
आजरा येथील रामतीर्थ प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात ३६ लाख २१ हजार १८६ रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. संस्थेच्या मालकीची सुसज्ज इमारत बांधण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष तुकाराम शिनगारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
संस्थेकडे ४६ लाख २८ हजार इतके वसूल भागभांडवल जमा असून १ कोटी ९० लाख ५९ हजार ८६४ इतका निधी जमा आहे. संस्थेकडे १७ कोटी ४९ लाख ५९ हजार ५५९ रुपयांच्या ठेवी असून सभासदांना साडेनऊ टक्के व्याज दराने १० कोटी ६६ लाख ३५ हजार ९६७ इतके कर्ज वितरण केले आहे.
संस्थेने तरलतेपोटी ९ कोटी ६१ लाख ७५ हजार २८० इतकी गुंतवणूक केलेली असून मार्च २०२१ अखेर संस्थेचे खेळते भांडवल २१ कोटी २४ लाख ९० हजार ४४२ इतके आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष चौगुले, संचालक शिवाजी गिलबिले, सुचिता लाड, धनाजी रावण, रवींद्र नावलकर, शिवाजी बोलके, संजय शिवणे, संजय बागडी, दशरथ कांबळे, सुरेखा घाटगे, तज्ज्ञ संचालक दत्तू बोटे, संस्थापक रावसाहेब देसाई, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, सल्लागार पांडुरंग अजगेकर, मारुती वरेकर, अर्जुन पाटील, लक्ष्मण कवीटकर, अर्चना पाटील, युनूस लाडजी, संघाचे तालुकाध्यक्ष मायकेल फर्नांडिस, सरचिटणीस रवींद्र दोरुगडे, कार्याध्यक्ष संजय मोहिते, कोषाध्यक्ष संतोष शिवणे, व्यवस्थापक विजय पताडे व कर्मचारी उपस्थित होते.
तुकाराम शिनगारे : २९०४२०२१-गड-०२